भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण;भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन व ‘स्नेहबंध’ चा संयुक्त उपक्रम
अहमदनगर (दि.२० जुलै):-भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन व स्नेहबंध सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
भिंगार कॅम्पचे पोलिस निरीक्षक योगेश राजगुरु यांनी बेकादेशीर मागण्याकरुन कायदा हातात घेणाऱ्या घटनांवरुन दाखल होणाऱ्या गुन्हयामुळे होणाऱ्या कायदेशीर बाबी आणि त्याचे दुष्परिणाम यांची उपस्थित नागरीकांना जाणीव करुन दिली. तसेच सामाजिक, जातीय व धार्मिक सलोखा अबाधित राहील याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी स्नेहबंध फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.उध्दव शिंदे,मुख्याध्यापक राजू भोसले,माजी प्राचार्य एकनाथ जगताप, शिवसेना भिंगार शहर प्रमुख सुनील लालबोंद्रे,भिंगार कॅम्प गोपनीय शाखेचे अजय गव्हाणे,संदीप घोडके,दीपक शिंदे व इतर १५ ते २० नागरीक,पोलिस अंमलदार उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण व वृक्षारोपणाचे महत्व या बाबत मार्गदर्शन केले.