केळी व्यापा-याचे ऑफीस फोडुन १ लाख १० हजार रोख रक्कम चोरणारा अवघ्या २ तासात कोतवाली पोलिसांकडून जेरबंद
अहमदनगर (दि.२० जुलै):-केळी व्यापा-याचे ऑफीस फोडुन रोख रक्कम चोरणा-या चोरट्यास कोतवाली पोलीसांनी अवघे २ तासात मुद्देमालासह ताब्यात घेण्यात यश आले आहे.दि.१९ जुलै रोजी फिर्यादी नामे सागर मिलींद गायकवाड (वय २४ वर्ष रा.दुधसागर सोसायटी केडगाव अ. नगर) यांनी फिर्याद दिली की,त्यांचे केळीचे गोडावूनचे ऑफीस बंद करुन मार्केटला गेले असता त्यांचे गोडावूनचे आँफिस अज्ञात चोरट्याने कुलूप तोडुन गल्यातील १ लाख १० हजार रुपये चोरुन नेले अशी फिर्याद दिल्याने कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं 1 ८१४/२०२४ बीएनएस कलम ३३१ (३), ३०५ प्रमाणे गुन्हा रजि.दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे अनुषंगाने पोलीस निरिक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना सदर गुन्ह्याचा तात्काळ तपास करणे बाबत आदेशीत केल्याने सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा फिर्यादी यांचे कडे काही दिवसा पूर्वी काम सोडुन गेलेला कामगार यानेच केला असावा त्या प्रमाणे तपास केला असता काम सोडुन गेलेला कामगार नामे चंद्रकांत दिगंबर इंगळे (रा.दुधसागर सोसायटी केडगाव अ. नगर) याचा शोध घेवुन त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता प्रथम त्याने मला काही एक माहीत नाही असे सांगीतले त्या नंतर पोलीसी खाक्या दाखवताच त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली व लपवुन ठेवलेले १ लाख १० हजार रुपये पंचासमक्ष काढुन दिले.पुढील तपास पोहेकों/रविंद्र औटी करित आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोसई प्रवीण पाटील व गुन्हेशोध पथकाचे पोहेकाँ योगेश भिंगारदिवे,पोहेकाँ गणेश धोत्रे,पोहेकाँ सुर्यकांत डाके,पोहेकाँ विक्रम वाघमारे,पोना अविनाश वाकचौरे,पोना सलीम शेख,पोकाँ अभय कदम, पोकाँ अमोल गाडे,पोकाँ सतिष शिंदे, पोकाँ दिपक रोहकले,पोकाँ तानाजी पवार यांनी केली आहे.