Maharashtra247

बसस्थानक परिसरात प्रवाशांचे पाकीट चोरणाऱ्या महिलेस कोतवाली पोलिसांनी शिताफीने घेतले ताब्यात

 

अहमदनगर (दि.२३ जुलै):-बसस्थानक परिसरातील प्रवाशांचे पाकीट चोरणारी महिलेस कोतवाली पोलीसांनी ताब्यात शिताफीने पकडले आहे.बातमीची हकीकत आशिकी,फिर्यादी नामे शहाजा समिर सय्यद ( रा.गांधीनगर दत्त मंदिर जवळ बोल्हेगाव) यांनी दि २८/०५/२०२४ रोजी फिर्याद दिली की,त्या व त्यांचा मुलगा एसटी बस ने करंजी ता.पाथर्डी येथे जाण्यासाठी माळीवाडा बसस्थानक येथुन बस मध्ये चढत असताना माझ्या मुलाच्या खीशामध्ये ठेवलेले मंगळसुत्र हे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेले याबाबत फिर्याद दिल्याने कोतवाली पोलीस स्टेशन गुरनंः ६३६/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माळीवाडा बस स्थानक येथे एक महिला संशयीत रित्या फिरत असल्याबाबत माहिती मिळाल्याने पोहेकॉ/विशाल दळवी,पोहेकॉ/रियाज इनामदार,पोकॉ/ तानाजी पवार,पोकॉ/ दिपक रोहकले,पोकॉ/सत्यम शिंदे,पोकॉ/अनुप झाडबुके,पोकॉ/सुरज कदम,पोकॉ/सुजय हिवाळे,मपोकॉ/मंडलीक यांना सदर महिले बाबत खात्री करण्यासाठी माळीवाडा बसस्थानक येथे जाणे बाबत आदेश दिल्याने वरील नमुद पोलीस अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे माळीवाडा बसस्थानक परिसरात जावुन पाहीले,असता एक महीला संशयीत रित्या फिरताना दिसली तिला ताब्यात घेवुन विचारपुस केली असता तिने उडवाउडवीचे उत्तर दिले त्यामुळे अधिक संशय निर्माण झाल्याने तीची महिलां पंच व महिला पोलीस अंमलदार यांनी बाजुस जावुन अंगझडती घेतली असता तीच्या कब्जातील पॅर्समध्ये एक अंदाजे ६ ते ७ ग्रॅम वजानचे सोन्याचे मण्यामध्ये गाठलेले पत्ता असलेले मंगळसुत्रं मिळुण आले.

सदरचे मंगळसुत्र कोठुन आणले याबाबत विचारपुस केली असता सदर महिलेने मनी मंगळसुत्र हे दि. २८.०५.२०२४ रोजी माळीवाडा बस स्थानक येथे अंदाजे नगर पाथर्डी जाणारी एसटीबस लागल्याने गर्दी मध्ये बस मध्ये चढताना एका मुलाच्या पॅटच्या खिशातील पाकीट चोरी केले होते त्यामध्ये सोण्याचे मनी असलेले पत्याचे मंगळसुत्र होते अशी कबुली दिल्याने सदर महिलेस ताब्यात घेण्यात आले असून सदर महिले कडून वरील गुन्हयातील एकुण २५०००/-रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचा तपास मपोना/वर्षा पंडित या करीत आहेत.सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार कोतवाली पोलिसांनी केली आहे.

You cannot copy content of this page