Maharashtra247

शिर्डी…साईबाबा थीम पार्क आणि लेझर शो करीता ४० कोटीचा निधी राज्य सरकारकडून मंजूर

 

अहमदनगर (दि.२४ प्रतिनिधी):-शिर्डी शहरामध्ये साकार होणाऱ्या श्री साईबाबांच्या जीवनावरील थीम पार्कसाठी राज्य सरकारने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

शहराच्या विकासासाठी नगरपरीषदांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी दिला जातो.शिर्डी नगरपरीषदेच्या माध्यमातून शहरात येणार्या लाखो भाविकांसाठी लेझर शो आणि थिम पार्क निर्माण करण्याची संकल्पना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यान्वित केली आहे.यासाठी राज्य सरकार कडून निधी उपलब्धते साठी प्रस्ताव दाखल केला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही थिम पार्क आणि लेझर शो करीता निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती.मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शिर्डी शहरा करीता नगर विकास विभागाने वैशिष्ट्य पूर्ण योजनेतून ४०कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने शहरात थीम पार्क आणि लेझर शो निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीने मंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सर्वच तिर्थस्थानाचा विकास करण्यास प्राधान्य दिले आहे.आता महायुती सरकारने जेष्ठ नागरीकांसाठी सुरू केलेल्या तिर्थ दर्शन योजनेत शिर्डीचा समावेश झाल्याने देशातील भाविकासाठी शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शना नंतर करमणुकीसाठी निर्माण होणारे थीम पार्क आणि लेझर शो शिर्डी तिर्थ क्षेत्राकरीता मोठी उपलब्धी ठरणार आहे.

You cannot copy content of this page