शहरातील उड्डाणपुलावरून ट्रक लोखंडी जाळ्या तोडून खाली दोन जण….
अहमदनगर (दि.२४ प्रतिनिधी):-अहमदनगर शहरातील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला आहे.एक ट्रक उड्डाणपुलावरील संरक्षण कठड्यावरील जाळी तोडून थेट उड्डाणपुलाखाली पडला.यात दोन जण गंभीर जखमी झाल्याचे माहिती समजत आहे.छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याच्या दिशेने निघालेला ट्रक आज बुधवार ता.२४ जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास उड्डाणपुलावरून जात होता.
उड्डाणपुलावरील वळणावर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट उड्डाणपुलावरील संरक्षण कठडे तोडत खाली रस्त्यावर पडला.या ट्रकमध्ये पीव्हीसी पाईप व त्याचे साहित्य होते. यात दोन जण गंभीर जखमी झाले.त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.