स्नेहालय संस्थेचे जनतेस जाहीर आवाहन
अहमदनगर (दि.२४ प्रतिनिधी):-मागील काही दिवसांपासून स्नेहालय संस्थेच्या नावाचा वापर करून Instagram व अन्य सोशल मिडियाच्या माध्यमातून संस्थेतील लाभार्थी मुलींसोबत विवाह करून देण्यासाठी पैसे मागण्याचे उद्योग काही समाजकंटक/ठकबाज करीत आहेत.
ज्यामुळे संस्थेबद्दल गैरसमज पसरत आहेत. तसेच आत्तापर्यंत अनेक विवाह इच्छुक तरुणांची व त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक झाली आहे.आणि त्यांनी त्यासाठी पैसे देखील गमावले आहेत.आम्ही या पोस्टद्वारे खुलासा करू इच्छितो की स्नेहालय संस्था वर्षातून एकदाच म्हणजे फक्त डिसेंबर महिन्यात सर्व कायदेशीर सोपस्कार पुर्ण करुन घेऊन लाभार्थी मुलींसोबत विवाह हा कार्यक्रम सार्वजनिकरित्या सरकारी परवानगीने राबविते.
त्यासाठी अतिशय पारदर्शक पद्धतीचा अवलंब केला जातो.या संपूर्ण कार्यक्रमासाठी कुठल्याही प्रकारचा पैसा स्नेहालय आकारत नाही. त्यामुळे अश्या कोणत्याही प्रकारच्या खोट्या अकाउंट आणि पोस्टला बळी पडू नका. अशी कोणतीही पोस्ट आढळल्यास आमच्या या हेल्पलाइन नंबर शी संपर्क साधावा.आमचा हेल्पलाइन नंबर आहे ९०११३६३६००.
कृपया कोणत्याही भुलथापांना व अमिषाला बळी पडु नका -डॉ.प्रीती भोंबे सचिव-स्नेहालय