धक्कादायक…शिर्डीत साई संस्थानच्या रुग्णालयात कचरा कुंडीत आढळला एका बालकाचा मृतदेह
अहमदनगर (दि.२५ प्रतिनिधी):-राहता तालुक्यातील शिर्डी साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात दि.२४ जुलै २०२४ रात्री अकराच्या वाजताच्या सुमारास स्त्री जातीच बेवारस अर्भक प्रसूती वॉर्ड शेजारील कचराकुंडीत (डस्टबिन ) मध्ये आढळून आले आहे.
याप्रकराने शिर्डी मध्ये एकच खळबळ उडाली आहे.सफाई कर्मचारी सफाई करत असताना हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॅरीबॅग मध्ये जड वस्तू दिसल्याने ते उघडून पाहिले असता त्यात स्त्री जातीच अवघ्या काही तासांपूर्वी जन्मलेल अर्भक मृत अवस्थेत आढळून आले.
चौकशी केली असता सदर अर्भक हे साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात जन्माला आले नसल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गोरक्ष गाडीलकर यांनी निदर्शनास आणून दिली. याबाबत साईबाबा संस्थान पोलिसात तक्रार दिली असून सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा सीसीटीव्ही तपासणी सुरू केली आहे.साईबाबा संस्थानच्या रुग्णालयासह परिसरातील सीसीटीव्ही ची तपासणी सध्या पोलीस प्रशासन करत असून,नेमकं हे अर्भक कुणी आणून टाकलं का? या बेवारस मृत अर्भकाचे माता-पिता कोण? याचा तपास करण्याचे आवाहन आता पोलिसांसह रुग्णालय प्रशासनासमोर आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.