कारगील दिवसानिमित्त २६ जुलै रोजी कार्यक्रमाचे आयोजन
अहमदनगर (दि.२५ प्रतिनिधी):- ३५ वा कारगील दिवस (रौप्य महोत्सवी वर्ष) दि.२६ जुलै, २०२४ रोजी सकाळी 10.00 वाजता महासैनिक लॉन्स, अहमदनगर येथे साजरा करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक व माजी सैनिकांनी या कार्यक्रमास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
कर्नल चेतन गुरबक्ष, कमांडींग ऑफीसर, 17 महाराष्ट्र बटालियन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात भारत मातेच्या रक्षणार्थ कारगील युद्ध तसेच इतर युद्धामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या जिल्ह्यातील जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता,वीरपिता तसेच युद्धामध्ये अपंगत्व आलेल्या आणि शौर्य पुरस्कारधारकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.