Maharashtra247

महागडे मोबाईल चोरणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या कोतवाली पोलिसांची कारवाई

 

अहमदनगर (दि.२५ प्रतिनिधी):-महागडे मोबाईल हँन्डसेट चोरी करणाऱ्या इसमास मुद्देमालासह कोतवाली पोलीसांनी केडगाव येथील दूधसागर सोसायटीतून घेतले ताब्यात,बातमीची हकीकत अशी की, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दाराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिलाली की,इमम नामे अजय ढोल्या चव्हाण (रा.दुधसागर सोसायटी केडगांव) याचेकडे चोरीचा मोबाईल असून तो त्याचा वापर करत आहे.अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पो.नि श्री.प्रताप दराडे यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेऊन कारवाई करणे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना आदेशित केले.

त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी दोन पंचासह आरोपीचे राहते घरी जावून छापा टाकला असता,त्या ठिकाणी मिळून आलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अजय बोल्या चव्हाण (रा. दुधसागर सोसायटी केडगांव) असे असल्याचे सांगितले,त्यावेळी त्याचे शर्टच्या खिशात असलेल्या मोबाईल विषयी चौकशी केली असता,तो घाबरुन म्हणाला की,सदरचा मोबाईल हा माझाच आहे.तेव्हा त्याचे कडे सदर मोबाईलचे बिलाविषयी चौकशी केली असता,तो काहीए‌क उत्तर न देता पळू लागला.

तेव्हा मोबाईल हा चोरीचा असले बाबत गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना संशय आल्याने त्यास जागीच पकडून त्याचे कडील मोबाईलची पाहणी केली असता, सदर मोबाईल हा ViVo कंपनीचा V20 मॉडेलचा असून त्याचा IMEI Να- 869329055508595, 869329055508587 असे असल्याने त्यास विश्वासात घेऊन मोबाईल विषयी अधिक चौकशी केला असता,त्याने सांगितले की,दि.२४ जुलै रोजी शहरातील अंबर प्लाझा बिल्डींग नगर पुणे रोड येथे एक इसम एटीएम मशिनमध्ये पैसे भरणा करत असताना मी त्याचे पॅन्टचे पाठीमागील खिशातून चोरी केला आहे असे सांगितले.

त्यानंतर आरोपीस अधिक विश्वास्रात घेऊन त्याने आणखी कुठे कुठे व कोणकोणत्या वस्तुची चोरी केली आहे.बाबत चोकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पंचासमक्ष त्याचे रहाते घराची झडती घेतली असता, त्याचे घरामध्ये आणखी वेगवेगळ्या कंपन्याचे 07 मोबाईल निळुन आले.एकुण 1 लाख 07,000/-(एक लाख सात हजार रुपये) किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.हि कारवाई पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ/ए. पी.इनामदार,पोहेकॉ/ विशाल दळवी,पोकॉ दिपक रोहोकले,पोहेकॉ/संभाजी कोतकर,पोहेकॉ/ भानुदास सोनवणे, मपोना/संगीता बड़े, पोकॉ/सुजय हिवाळे, पोकॉ/सत्यजीत शिंदे, पोकॉ/तानाजी पवार, पाकॉ/सुरज कदम, पोकॉ/अनूप झाडबुके, पोकॉ/अतुल काजळे, पोकॉ/संकेत धिवर, पोकॉ/सचिन लोळगे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page