अखेर चौथ्या दिवशी खा.निलेश लंके यांचे या आश्वासनानंतर उपोषण स्थगित
अहमदनगर (दि.२५ प्रतिनिधी):-गेली चार दिवसापासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय समोर खासदार निलेश लंके यांनी पोलिसांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात सुरू केलेले उपोषण आज सोडले आहे.
राज्याचे माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी आज दुपारी उपोषण स्थळी भेट दिली व तेथून नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला.यावेळी १५ दिवसांत नि:पक्ष चौकशी करू असे आश्वासन त्यांनी दिले व त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.या चार दिवस दरम्यान खा.निलेश लंके यांची प्रकृती ढासळली होती त्यांना सलाईनही देण्यात आले होते परंतु त्यांची भूमिका ठाम होती.परंतु आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आले.