Maharashtra247

अहमदनगर जिल्ह्यात कृषी विभाग ॲक्शन मोडवर तब्बल ६५२ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी निलंबन

 

अहमदनगर (दि.२८ जुलै):-यंदा खरीप हंगामाच्या सुरूवातीपासून कृषी विभाग जिल्ह्यात खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या काळाबाजार यासह अन्य गैरप्रकार करणार्‍या कृषी केंद्रांविरोधात आक्रमक असल्याचे दिसून आले आहेत.जिल्ह्यात १५ भरारी पथकांमार्फत आतापर्यंत ६५२ कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात कीटकनाशक विक्रीचे ३११८,बियाणांचे ४८८९ व खत विक्रीचे ४०९८ असे एकूण १२ हजार १०५ परवाने वितरित करण्यात आले आहेत. यापैकी कीटकनाशकांचे २११ खतांचे १९५ व बियाणांचे २४६ असे एकूण ६५२ परवाने कायमस्वरूपी निलंबित करण्यात आले आहे.यात सर्वाधिक अकोले ८७ व श्रीरामपूरमध्ये ८५ तर राहुरी ६६,नगर ६३, पारनेर ६३,पाथर्डी २६, कर्जत २५,श्रीगोंदे ५८, जामखेड ३१,शेवगाव २१,नेवासा २८,संगमनेर ५१,राहता ३३ आणि कोपरगाव तालुक्यात १५ परवाने रद्द करण्यात आले आल्याची माहिती अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी दिली.

यापुढेही जिल्ह्यात खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या काळाबाजार यासह अन्य गैरप्रकार करणार्‍या कृषी केंद्रांविरोधात अधिक तीव्र कारवाई केली जाणार असल्याचे अधीक्षक बोराळे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page