रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसा निमित्त संबोधी वस्तीगृहात भोजनदान
अहमदनगर (दि.२८ जुलै):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दीपकभाऊ निकाळजे यांचा वाढदिवस शहरातील फकीरवाडा येथील संबोधी विद्यार्थी वस्तीगृह येथे साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त इतर वायफट खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जपून वस्तीगृहातील गोरगरीब विद्यार्थ्यांना भोजनदान देण्यात आले.यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष संदीप वाघमारे म्हणाले की दरवर्षीप्रमाणे यंदाही वायफट खर्च न करता सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून वायफट खर्च न करता येथील वस्तीगृहातील मुलांना भोजनदान देण्यात आले याचा आनंद होत आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, युवक शहराध्यक्ष संदीप वाघमारे,संबोधी विद्यार्थी वस्तीगृहाचे अधीक्षक नितीन कसबेकर,योसेफ मगर,तपासे सर,शिंदे सर,अजित साळवे. विनोद घोरपडे,आशिष साळवे,विजू पाथरे, संतोष भवरे,नागेश सांगा,विलास नन्नवरे, कुबेर शेख,विठ्ठल शिरसाट,संजय परदेशी, राजेश तुपे,विद्यार्थी व शहरातील सर्व पदाधिकारी व भीमसैनिक उपस्थित होते.