डेंग्यू मुक्त अभियानात आठवड्यातुन दर रविवारी एक तास नागरिकांनी सहभागी व्हावे-मनपा आयुक्त यशवंत डांगे
अहमदनगर (दि.२८ जुलै):-अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या संकल्पनेतून डेंग्यू मुक्त अभियानात आठवड्यातुन दर रविवारी एक तास नागरिकांना सहभागी करून कुंड्या,कूलर,जुन्या निरोपयोगी वस्तू,टायर यामध्ये साचलेले पाणी रीकामे करण्यात यावीत व कोरडा दिवस पाळावा असे आवाहन केले.
या अभियानास केडगाव उपनगरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतीसाद दिला.नागरीकांनी स्वतः सहभागी होऊन मोहीम राबवली आहे.केडगाव आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा सेविकासह यांनी घरोघरी जाऊन डेंगू, हिवताप,चिकनगुनिया या आजारांबद्दल माहिती दिली त्यावेळी अनेक महिला नागरिक यावेळी उपस्थित होत्या.
ही मोहीम केडगाव भागामध्ये राबवण्यात आली आली असून नागरिकांनी उघड्या पाण्याच्या टाक्या पाणीसाठे झाकून ठेवावे,कुलर फुलदाणीतील पाणी दररोज बदलावे, जुने टायर नारळाच्या करवंट्या टाकाऊ वस्तु नष्ट कराव्यात,सेफ्टी टॅंकच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी,पाण्याचे साठे भांडी घासण्यापासून स्वच्छ आणि कोरडे ठेवावे,आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा तसेच ताप-डोके-डोळे- सांधे दुखणे,मांसपेशी दुखणे तापा सोबत,अंगावर लालसर पुरळ येणे,उलट्या होणे पोट दुखणे उलटी लक्षण आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन सल्ला घ्यावा तसेच डेंग्यू,हिवताप, चिकनगुनिया हे आजार डासां मार्फत होतात त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये डेंग्यू आजारावर योग्य वेळेत औषध उपचार केल्यास रुग्ण खात्रीने बरा होतो डेंगू आजाराच्या निदानासाठी जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे मोफत रक्ताची एलायझा चाचणी करून घ्यावी तपासाची लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिकेच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी दिली.
यावेळी या मोहिमेप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे,केडगांव आरोग्य केंद्राचे डॉ.गिरीश दळवी,नीमाचे डॉ.सुभाष बागले यांच्यासह सर्व कर्मचारी आशा स्वयंसेविका,पारिचारिका कर्मचारी तसेच परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .