चंद्रपूर शिवसेना शिंदे (गटाच्या) वतीने प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत महिलांना गैस सिलेंडर कीट वाटप
चंद्रपूर (प्रतिनिधी):-हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर पाऊल ठेऊन,शिवसेना पक्षाचे मुख्यनेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणाली प्रमाणे आणि “एक हात मदतीचा” या वाक्याचा अवलंब करत,पूर्व विदर्भ संघटक किरणभाऊ पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या बाळासाहेबांच्या व्याख्येप्रमाणे दि.२७ जुलै २०२४ रोजी चंद्रपूर शिवसेना पक्षाचे महानगर प्रमुख भरत गुप्ता यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सदालावार महाकाली कॉलनी चंद्रभुजा वार्ड चंद्रपुर येथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत महिलांना गैस सिलेंडर कीट वाटप व वृक्षारोपण साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन महिला आघाडी शहर प्रमुख वाणी सदालावार यांनी केले होते.यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकूर,जिल्हा उपप्रमुख मायाताई मेश्राम आणि मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.