अहमदनगर (दि.२ ऑगस्ट):-एमआयडीसी परीसरातील सपना ट्रान्सपोर्ट सर्व्हिस समोर उभ्या असलेल्या ट्रक मधून इलेक्ट्रीक मोटारीच्या चोरी करणारा आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथुन जेरबंद केले आहे.चोरट्याकडून तब्बल 5 लाख 65,000-रु. किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
उभ्या असलेल्या टाटा एलपीटी 909 या गाडीतुन अज्ञात चोरटयाने इंक्हिऑन कॉपरेशन कंपनीच्या अत्यंत महागड्या ४ इलेक्ट्रीक मोटारी चोरुन नेल्या होत्या.आकाश नामदेव वाघ (धंदा- शिक्षण रा.नागापुर ता. जि.अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गु.रजि.नंबर 595/2024 भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्हयाचा तपास करत असतांना एमआयडीसी पोलिसांनी एमआयडीसी परिसरात असणारे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले,त्यामध्ये सदर गुन्हयातील चोरी केलेल्या इलेक्ट्रिक मोटारी या पांढ-या रंगाचे पिकअप मध्ये भरुन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पिकअप गेलेली दिसली.
मात्र पिकअपचा नंबर हा खोडलेला होता.त्यावेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अमंलदार यांची टिम तयार करुन हि टिम छत्रपती संभाजी नगरला सपोनी/माणिक चौधरी यांनी रवाना केली.एमआयडीसी अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील जवळजवळ ४० सीसीटीव्ही कॅंमेरे पोलिसांनी चेक करुन सदर पिकअप बाबत माहिती मिळवली.त्याच वेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/ माणिक चौधरी यांना गोपनिय माहिती मिळाली की,सदर गुन्हा हा आरोपी नामे आवेज कलीम पटेल रा.अंधारी ता.सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर,कबीर बुढन पठा लण रा.वाळूंज जि. छत्रपती संभाजीनगर (फरार) तसेच त्यांचे इतर साथीदार यांनी मिळुन केला आहे.त्यावरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक हे छत्रपती संभाजीनगर येथे जावुन यातील आरोपी आवेज कलीम पटेल रा.अंधारी,ता.सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर यास पकडुन त्याचे कडुन गुन्हयात वापरलेला ५,०००০০ /-रु किमतीचा एक महिंद्रा कंपनीचा पांढ-या रंगाचा पिकअप तसेच ६५,०००/-रु.किमतीच्या ईव्हिऑन कॉपरेशन कंपनीच्या चार इलेक्ट्रीक मोटारी असा एकुण 5,65,000 1-रु किमतीचा मुददेमाल जप्त केला.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग श्री.संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शानाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/माणिक चौधरी प्रभारी यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ/ संदीप चव्हाण,पोहेकॉं/ गणेश कावरे,पोहेकॉ/राजु सुद्रिक,पोना/बंडु भागवत,पोकॉ/किशोर जाथव,पोकॉ/नवनाथ दहिफळे,पोकॉ/अक्षय रोहकले,पोकॉ/गोरक्षनाथ केदार,मोबाईल सेलचे पोकॉ/राहुल गुंडु यांनी केली आहे.
