अहमदनगर (दि.२ ऑगस्ट):-रात्रीचे वेळी प्रवाशाचे अपहरण करुन त्यांना जखमी करुन लुटमार करणारा फरार असलेल्या आरोपीस पकडण्यात कोतवाली पोलीसांना यश आले आहे.
बातमीची हकीकत आशिकी,दि.१४/७/२०२४ रोजी फिर्यादी आनिल गोरख हाडे (रा.मैदा ता.जि.बीड) हे अहमदनगर येथून पुणे बसस्टॅन्ड येथे बीडकडे जाणारे गाडीची बस स्टॅण्ड बाहेरील रोडवर वाट पहात आसताना काळया रंगाचे स्प्लेंडर मोटार सायकलवर दोन अनोळखी ईसमांनी त्यांना बळजबरीने बसवून अज्ञात ठिकाणी नेवून त्यास जबर मारहाण करुन त्याचे मोबाईल पॅनकार्ड, आधारकार्ड,एटीमकार्ड व खिशातील ९००/- रूपये कॅश व एटीएमचा पासवर्ड मारहाण करुन घेवुन नंतर त्यातील १,४४,००/-रुपये काढून घेतले आहेत वगैरे मजकुरच्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशनला गु.र.नं। ८१७/२०२४ भारतीय न्याय सहींता २०२३ चे कलम १४०(३), ३०९/६), प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना कोतवाली पोलीसांनी बबल्या ऊर्फ अनिकेत शंकर वाकळे यास या पुर्वीच अटक करण्यात आली होती,परंतु त्याचा साथीदार गुन्हा केल्या नंतर पसार झालेला होता,सदर पसार आरोपी सुरज ऊर्फ राजु केदारे हा वांरवार आपला ठावठिकाणा बदलत शिर्डी,मुंबई,भायंदर या ठिकाणी वास्तव्यास होता त्याचा शोध घेत असताना अखेर कोतवाली पोलीसांना तो नगर शहरात आल्याची माहीती मिळाल्याने माळीवाडा बसस्थानक येथे आल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळताच पोलीस निरिक्षक प्रताप दराडे यांनी तात्काळ सदर ठिकाणी शोध घेणे बाबत सुचना दिल्याने गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना तात्काळ त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे सदर गुन्ह्याबाबत अधिक सखोल चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा हा नशा करुन मौज-मजा करण्यासाठी व गर्लफ्रेंडला महागडया भेटवस्तु देण्यासाठी त्याचे साथीदार यांचे सोबत मिळून केला आहे.अशी कबुली दिली तसेच गुन्ह्यात वापरलेली हिरो-होंडा स्पलेंडर मोटार सायकल व फिर्यादीचा मोबाईल फोन व बँग हि सदर आरोपी कडुन हस्तगत करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोसई/शितल मुगडे या करित आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला,अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार मसपोनि/योगीता कोकाटे,मपोसई/शितल मुगडे व गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ/योगेश भिंगारदिवे,गणेश धोत्रे, ज्ञानेश्वर मोरे,विशाल दळवी,चापोहेकाॅ/सतिश भांड,पोना/अविनाश वाकचौरे,सलीम शेख, पोकॉ/अभय कदम,अमोल गाडे, सतिष शिंदे,अतुल काजळे मोबाईल सेलचे पोकॉ/राहुल गुंडु यांनी केली आहे.
