अहमदनगर (दि.२ ऑगस्ट):-अहमदनगर जिल्हा पोलीस को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि.अ.नगर या संस्थेच्या चेअरमन पदी बाळासाहेब काशिनाथ भोपळे यांची तर व्हा.चेअरमनपदी राहुल राजेद्र द्वारके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हा पोलीस को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.अ.नगर या संस्थेची पंचवार्षीक निवडणुक दि. ०९/०४/२०२३ रोजी झाली.त्यामध्ये परिवर्तन पॅनलने १५/० असा विजय प्राप्त केला होता.त्यावेळेस निवडुन आलेल्या संचालकांपैकी दि.२३/०४/२०२३ रोजी चेअरमन व व्हा.चेअरमन यांची निवड झाली होती.त्यामंध्ये श्री. संदीप काशिनाथ घोडके चेअरमन व व्हा.चेअरमनपदी श्री. वैभव मच्छीद्र झिने यांची बिनविरोध निवड झाली.
त्यावेळेस सर्व संचालका मध्ये एकमत होवुन असा निर्णय घेण्यात आला की,कामाचा अनुभव येण्याकरिता प्रत्येकवर्षी संचालक मंडळावरील संचालकाला कोणत्यातरी पदावर काम करण्याची संधी मिळाली पाहीजे.या करिता श्री.दिपक भास्कर घाटकर यांची सचिव पदी निवड केली होती.मागील १ वर्षाच्या कालावधी दरम्यान चेअरमन श्री.संदीप काशीनाथ घोडके व व्हा.चेअरमन श्री.वैभव मच्छीद्र झिंने व सचिव श्री.दिपक भास्कर घाटकर यांच्या कार्यकाळात सभासदाचे हिताचे व काही चांगले निर्णय एकमताने मंजुर करण्यात आले आहे.१) सर्व प्रथम सोसायटीचे ऑफलाईन सॉप्टवेअर हे ऑनलाईन केले ऑनलाईनमुळे प्रत्येक सभासदाला आपल्या खात्यावरील माहीती मिळणेकामी मोबाइईल अॅप इनस्टॉल केले.
सोसायटी कार्यालयामध्ये पारदर्शकता आणणेकामी सी.सी.टी.व्ही.फुटेज कँमेरे बसविण्याचा निर्णय घेवुन ते बसविण्यात आले.तसेच सभासदाच्या कर्जाला संरक्षण मिळावे यासाठी सभासद सुरक्षा कवच नावाखाली पॉलीसी सुरु केली.प्रत्येक सभासदांचे कर्ज मंजुर रक्कमेतुन २ टक्के रक्कम सभासद सुरक्षा कवच म्हणुन कपात करण्याचा चांगला निर्णय घेण्यात आला. यामधुन सभासद कोणत्याही कारणाने मयत झाल्यास त्यांचे कर्ज सभासद सुरक्षा कवच या योजनेनुसार सभासदाचे कर्ज माफ केले जाईल,यामुळे सभासदाच्या वारसदाराला व जामीनदाराला यामधुन दिलासा मिळणार आहे.
असा चांगला निर्णय मागील १ वर्षाच्या काळात घेण्यात आला. तसेच कर्ज मर्यादा रुपये ६,०००००/-(अक्षरी सहा लाख) वरुन रुपये १०,०००००/- (अक्षरी दहा लाख) पर्यंत कर्ज मर्यादा केली.त्याप्रमाणे सभासदांना कर्ज वाटप सुरु आहे.अशा प्रकारे १ वर्षाच्या कालावधी मध्ये पोलीस सोसायटीच्या सभासदांसाठी चांगले निर्णय संचालक मंडळाने एकमताने घेतले आहे. यापुढे नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन,सचिव यांना शुभेच्छा देवुन पुढील वाटचालीस आधिका अधिक सुधारणा करण्याच्या हार्दीक शुभेच्छा संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आल्या.
यावेळी चेअरमन श्री.संदीप काशिनाथ घोडके,श्री.वैभव मच्छीद्र झिने व्हा.चेअरमन,सचिव श्री.दिपक भास्कर घाटकर,संचालक श्री. रेवणनाथ कारभारी दहीफळे,श्री.बाळासाहेब काशिनाथ भोपळे संचालक,श्री.सचिन सुदाम शिरसाठ संचालक,श्री.जावेद बुढन शेख संचालक,श्री. भिमराज किसन खर्से संचालक,श्री.अभिजित दत्तात्रय अरकल सचालक,श्री.राहुल राजेद्र व्दारके संचालक,श्री.रिचड रघुवीर गायकवाड संचालक,श्री.संदीप सुरेश जाधव संचालक,श्रीमती सविता चंद्रभान खताळ संचालिका,श्रीमती मनिषा नवनाथ काळे संचालिका,श्रीमती प्रज्ञा सुभाष प्रभुणे संचालिका,श्री.प्रकाश शेषराव पाठक सोसायटी स्टाफ,श्री.अक्षय दिपक पाठक सोसायटी स्टाफ,तसेच श्री.वेभव मोराडे सह-निबंधक सह-संस्था अ.नगर हे उपस्थित होते.
