अहमदनगर प्रतिनिधी (दि.१३ जानेवारी):-अहमदनगर मध्ये पोलीस भरती प्रक्रियेत शिपाई पदासाठी चाचणी सुरू असताना उत्तेजक द्रव्य घेतल्याच्या संशयावरून एका तरूणाला ताब्यात घेत त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.गुरूवारी दि.12 जानेवारी रोजी मैदानी चाचणी सुरू असताना अरणगाव (ता.नगर) येथे धावण्याच्या चाचणी वेळी एका उमेदवाराने उत्तेजक द्रव्य घेतल्याच्या संशयावरून त्याची तपासणी करण्यात आली.नाशिक येथे त्याचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली आहे.1600 मिटर धावण्यासाठी पोलीस मुख्यालयातून अरणगाव येथे जाणार्या प्रत्येक उमेदवाराची तपासणी केली जाते.या तपासणीदरम्यान मालेगाव येथील तरूणाच्या बॅगमध्ये उत्तेजक द्रव्याच्या तीन सिरीज व इंजेक्शन आढळून आले. दरम्यान पोलिसांनी त्याचे लेखी घेतल्यानंतर त्याची मैदानी चाचणी घेतली. चाचणी पूर्ण झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली.वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.
