नगर प्रतिनिधी (दि.१३ जानेवारी):-सध्या राज्यामध्ये थंडीची तिव्र लाट सुरू आहे.तरी शासनाकडून नागरीकांना सतर्कचे आवाहन केले जात आहे.अशा परिस्थितीत सकाळच्या सत्रात सुरू असणा-या शाळेतील विदयार्थ्यांना थंडीचा तिव्र सामना सहन करावा लागत आहे.त्यातून विदयार्थ्यांना काही अपघात होण्याची शक्यता होवू शकते.कारण सद्याची थंडी पाहता आपण सकाळच्या सत्रातील शाळा एक ते दिड तास उशीराने सुरू कराव्यात जेणे करुन विदयार्थ्यांना या थंडीच्या लाटेपासून कोणत्याही प्रकारे शारिरीक हानी होणार नाही.याबाबत आपण तातडीने निर्णय घेवुन त्याची अंमलबजावणी करावी व तसे सर्व शाळेंना आदेश दयावेत अशी मागणी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी चंद्रकांत काका शेळके सावेडी उपनगरप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना,उपजिल्हाप्रमुख मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष सहाय्यता निधी,संपर्कप्रमुख रणजित परदेशी,शहराध्यक्ष अनिकेत कराळे,तारीक कुरेशी इ. उपस्थित होते.
