अहमदनगर प्रतिनिधी (दि.१३ जानेवारी): नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये शेवटच्या क्षणी विद्यमान आ.डॉ.सुधीर तांबे यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने उमेदवारी घोषित होऊन एबी फॉर्म देखील देण्यात आला होता. मात्र,त्यांनी फॉर्मच भरला नाही. त्यावरून काँग्रेस श्रेष्ठींनी तांबे पिता-पुत्रांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.त्यातच आता अहमदनगर जिल्ह्यातील प्रा. सुभाष चिंधे यांनी काँग्रेस, महाविकास आघाडीने या निवडणुकीसाठी मला पुरस्कृत करावे,अशी मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.प्रा.चिंधे यांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. छाननी प्रक्रियेमध्ये तो वैध ठरवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. चिंधे हे गेल्या 20 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून प्राध्यापक म्हणून सेवा करत आहेत.महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघटनेच्या पुणे विभागाचे ते उपाध्यक्ष आहेत. तसेच,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत.प्रा.चिंधे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,मागच्याही टर्म वेळी मी पदवीधर निवडणुकीसाठी प्रयत्नशील होतो.मागील तीन वर्षांपासून मी अहमदनगरसह नाशिक, धुळे,नंदूरबार,जळगावचा दौरा करत सर्व भाग पिंजून काढला आहे.माझा शिक्षक वर्गासह वकील, डॉक्टर आणि एकूणच पदवीधरांमध्ये मोठा जनसंपर्क आहे.मी मोठ्या संख्येने पदवीधर नावनोंदणी देखील केली आहे.मला काँग्रेस,महाविकास आघाडीने पुरस्कृत करावे,अशी मागणी करणार आहे.त्यासाठी मी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील,काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना निवेदन देणार आहे.माझी वैयक्तिक तयारी आणि काँग्रेस सह शिवसेना, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीशी समविचारी असणार्या संघटना यांच्या पाठिंब्याने मी ही निवडणूक नक्कीच जिंकू शकेल,असा मला पूर्ण विश्वास आहे.प्रा.सुभाष चिंधे यांनी यामुळे काँग्रेसकडून पुरस्कृत होण्यासाठी केलेला दावा हा या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
Trending Topics:
Trending
- प्रभाग 10 मध्ये सविताताई घोडतुरेंची धडाकेबाज एन्ट्री..! विकासाची नवी दिशा..राजकारणाच्या समीकरणात खळबळ!
- निलंबित DYSP असल्याचे खोटे नाटक..! दोन पोलिस शिपायांना ४० लाखांना गंडा अहिल्यानगर मध्ये धक्कादायक प्रकार..!
- मोहटादेवी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची घोषणा..! हे असतील विश्वस्त
- अंबरनाथ प्रभाग २५ मध्ये ‘सेवेच्या’ बळावर नवा दमदार चेहरा..स्वप्नाली शिंदे यांची निवडणुकीच्या रिंगणात धमाकेदार एन्ट्री..!
- प्रभाग ७ ला मिळणार विकासाचा नवा ध्यास..सामाजिक कार्यकर्ते संजय ठोंबरे यांची नगरसेवकपदासाठी दमदार दावेदारी..!
- अपंग महिलेशी एसटी कंडक्टरची आरेरावी..सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत संतप्त..!जबाबदार कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी
- अहिल्यानगरची विकासदौड सुरु..! सुशोभीकरण मोहीम झंझावाती वेगात..शहराचा चेहरा मोहरा बदलणारच..आमदार संग्राम जगताप यांचे व्हिजन ठरतेय गेमचेंजर
- “जनतेच्या हक्काची नवी दिशा; प्रभाग १६ मधून जयश्रीताई टकले निवडणुकीच्या मैदानात!”
