सीनियर जर्नालिस्ट फेडरेशनची राज्य कार्यकारिणी जाहीर..प्रदेशअध्यक्ष पदी ओमप्रकाश शिदे तर सरचिटणीस संजय जोशी
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-सीनियर जर्नालिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया (SJFOI) च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश शिंदे (जालना), तर संजय जोशी (पुणे) यांची राज्य सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय सचिव डॉ. जयपाल पाटील यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली.यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी गोपाळ शेळके, खजिनदार पदी डॉ.जयपाल पाटील तसेच कायदेशीर सल्लागार ॲड.
ओंकार माने व ॲड.सुनील रावडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.तसेच विभागीय अध्यक्षांच्या निवड करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यादवराव पावसे, पश्चिम महाराष्ट्र भगवानराव परळीकर, मराठवाडा मकरंद जहागीरदार, कोकण राजा मोकाटे यांचे विभागीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
तसेच रायगड जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील, सरचिटणीस श्रीकांत सहस्त्रबुद्धे,उपाध्यक्ष भारती शहा यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष संदीप दीक्षित आणि निरीक्षक सुहासिनी प्रभूगावकर यांच्या मान्यतेने राज्य कार्यकारणी व विभागीय अध्यक्ष आणि पदाधिकारी निवड घोषित करण्यात आल्याची माहिती डॉ. जयपाल पाटील यांनी दिली. तसेच फेडरेशनचे महाराष्ट्र अधिवेशन २५ व २६ नोव्हेंबररोजी पुणे येथे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.बैठकीत राज्यातील विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख,आयेशा शेख मुलानी, बालाजी अडियल,अभयकुमार यादव, सौ.भारती शहा आदी उपस्थित होते.
