मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ व दाखल्याचे वितरण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न
संगमनेर (दि.४ प्रतिनिधी/राजेंद्र मेढे):-महाविकास आघाडीत कोणतीही एकवाक्यता राहीलेली नाही.उध्दव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत.शरद पवार सातत्त्याने मुख्यमंत्र्याना भेटत आहेत.काॅगेसमध्ये मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लाग्ल्याने महायुतीत आता एकवाक्यता राहीलेली नाही.त्यामुळे राज्यात महायुतीचीच सता येणार आहे. योजेनमुळे सर्व बहीणींचा आशीवार्द महायुतीलाच मिळणार असल्याचा विश्वास महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
निमगावजाळी येथे महसूल दिनाच्या निमिताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ आणि दाखल्याचे वितरण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे तहसिलदार धीरज मांजरे पद्मश्री डॉ.विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास कोते प्रवरा बँकेचे मच्छींद्र थेटे रामभाऊ भुसाळ भाऊसाहेब जर्हाड संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ गुलाबराव सांगळे यांच्यासह सर्व संस्थाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि लाभार्थी याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की जनतेच्या मनातील सरकार सतेवर असल्याने मोठ्या प्रमाणात योजना सुरू झाल्या केवळ घोषणा नाहीतर अंमलबजावणी सरकारची असून त्याचा लाभ थेट जनतेपर्यत पोहचविण्या करीता महसूल पंधरवडा आयोजित केला असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
राज्यात महायुती सरकारमुळे शेतकऱ्यांचे वीज बील माफ केले आहे.मुलीसाठी उच्चशिक्षण मोफत केले आहे.मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजनेचा लाभ जेष्ठ नागरीकांना मिळणार मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेकरीता जिल्ह्यात सहा लाख अर्ज दाखल झाले असून संगमनेर तालुक्यात ८८हजार अर्ज दाखल झाले आहेत.लाडक्या बहीणीना रक्षाबंधनच्या दिवशी योजनेचा लाभ देण्यात येणार असून महायुतीच्या पाठीशी लाडक्या बहीणीचा आशीर्वाद निश्चित राहील असा विश्वास व्यक्त करून फक्त योजना आपल्या महायुती सरकारची आहे मात्र उड्या महाविकास आघाडीचे नेते मारत असल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला.
महायुती सरकार पारदर्शीपणे काम करीत असून भ्रष्टाचाराला कुठेही थारा नाही.राज्यात चार तलाठीना नियुक्तीपत्र दिले अहील्यानगर मधील १८९ उमेदवार आहेत.पण तलाठी पदाच्या भरती प्रकरीयेवरून केवळ महसूल विभागाला आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न जाणीवपुर्वक केल्याचा आरोप मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
तालुक्यात ३४हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना २०कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले असून ८४ हजार शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त करून महाविकास आघाडीत कोणतीही एकवाक्यता राहीलेली नाही.उध्दव ठाकरे काय बोलतात याचे भान त्यांना राहीलेले नाही औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले असून शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागे वाढल्या आहेत.काॅगेसमध्ये प्रत्येकजण मुख्यमंत्री पदाचा दावेदार झाल्याने त्यांचे स्वप्न मुंगेरीलाल के ठरणार असल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला.