Maharashtra247

राजस्थानी परिवाराच्या वतीने बेलेश्वर मंदिर परिसरात ५१ झाडांचे वृक्षारोपण

 

अहमदनगर (दि.४ ऑगस्ट):-हरताली अमावस्या व श्रावण महीन्याच्या सुरुवातीलाच राजस्थानी परिवाराच्या वतीने भिंगार येथील बेलेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी ५१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

सध्या वृक्षांची तोड मोठ्या प्रमाणात होत आहे यामुळे निसर्गही वेळोवेळी मानवाला धोका देत आहे.पाऊस वेळेवर होत नाही याचे कारण म्हणजे वृक्षतोड आहे त्यामुळे समाजातील सर्व नागरिकांनी ‘एक माणूस एक झाड’ या पद्धतीचा अवलंब करून वृक्षारोपण करावे त्याचा फायदा मनुष्याला भविष्यात नक्कीच होणार आहे असे यावेळी वृक्षारोपण करताना राजस्थानी परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी विष्णु महाराज जी,ब्रम्हानन्द जी,बाली जोशी,हिमता रामजी देवाशी,दलाराम जी,जेरूपा रामजी,पराग देवाशी,जगदीश देवाशी,दुर्गेश चौधरी,गणेशा राम चौधरी,राजू भाई चौधरी,रमेश चौधरी,चम्पा लाल जी चौधरी,बस्तीराम जी चौधरी,सवाई सिंह,रेवत सिंह,भवानी सिंह,प्रताप सिंह,लाल जी,रामवतार जी,नेमीचन्द जी,विनोद तिवारी,श्री गोपाल जी जोशी,मुकेश खजवाणीया,श्री निवास खंडेलवाल,जितेन्द्र जी खंडेलवाल समस्त राजस्थानी परिवार उपस्थित होते.

You cannot copy content of this page