वणी प्रतिनिधी (दि.१२ ऑगस्ट):-माधुरी टॉक शो या माध्यमातून यूट्यूब चैनल वरून नाशिक येथील महिला समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे.तसेच दलित समाजातील महिलांचा खोट्या विषयात प्रचार करत आहे.
यासंदर्भात यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या निशा गवई यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी वणी जिल्हा यवतमाळ यांना दि.१२ ऑगस्ट २०२४ रोजी निवेदन दिले आहे व या निवेदनात म्हटले आहे की,सदरील महिला ही गेल्या दोन वर्षापासून दलित महिलांना त्रास देऊन वेगवेगळे युट्युब चायनल ओपन करून त्याद्वारे मागासवर्गीय समाजाबद्दल अपमान कारक वक्तव्य करत असते व तिच्यावर ॲट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हेही दाखल आहेत.
परंतु आजतागायत तिच्या या यूट्यूब चैनल वर कोणीही कोणतीही कारवाई केलेली नाही,किंवा त्या महिलेला अटक केलेली नाही.याबाबत दि.१३/०९/२०२४ रोजी सामाजिक कार्यकर्त्या निशा गवई व सत्यभामा सौंदरमल या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे.
तरी सदरील आरोपी महिलेस त्वरित अटक करण्यात यावी व तिने चालू केलेले यूट्यूब चैनल त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा आत्मदहन करण्यास ही मागेपुढे पाहणार नाही. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
