अहमदनगर दि.१३ ऑगस्ट):-विळद परीसरातुन महिंद्रा कंपनीच्या पिकअपची चोरी करणाऱ्या दोघा चोरटयांना एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.यामध्ये पोलिसांनी ९ लाख रुपयांची पिकअप ताब्यात घेतली आहे.
दि.१२/११/२०२३ रोजी यातील फिर्यादी नामे कुलदीप किशोर जगताप (रा.विळद) यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती कि.दि ११/१२/२०२३ रोजी कोणीतरी अज्ञात चोरटयाने माझी महिंद्रा कंपनीची पिकअप वाहन क्र एम एच ४२ बी ३१७३ ही प्रियंका हॉटेल जगताप नर्सरी विळद येथुन स्वतचे आर्थिक फायदया करीता लबाडीचे इरादयाने माझे संमती शिवाय चोरुन नेली आहे.वगैरे मजकूरावरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं १०२९/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास करत असताना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/माणिक चौधरी यांना गोपनीय बातमी मिळाली कि सदर गुन्हा हा प्रसाद संजय मोरे (रा.खडांबे खुर्द ता.राहरी जि.अहमदनगर),वेदांत शिवप्रसाद वाकचौरे (रा. धांदरफळ बु.ता. संगमनेर जि.अहमदनगर),महेश सोपान पागिरे (रा.बोल्हेगाव ता.जि.अहमदनगर) यांनी मिळुन केला आहे. सपोनि/चौधरी सो यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन सदर इसमांचा शोध घेण्यास पाठवले.पथक शोध घेत असताना या घटनेतील एका इसमास महिंद्रा पिकअपसह धांदरफळ बुद्रुक येथुन पकडले व त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव वेदांत शिवप्रसाद वाकचौरे (रा.धांदरफळ वु.ता.संगमनेर जि.अहमदनगर) असे सांगितले.
त्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले. तसेच रात्री सापळा लावुन प्रसाद संजय मोरे (रा.खडांवे खु्द ता.राहरी जि.अहमदनगर) यास राहरी येथुन ताब्यात घेण्यात आले. सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/माणिक चौधरी प्रभारी यांच्या पथकातील पोहेकॉ/विशाल थोरात,पोना/विष्णु भागवत,पोकॉ/किशोर जाधव,पोकॉ/नवनाथ दहिफळे, चापोकॉ/गवारे,पोहेकॉ चौधरी व मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांनी केली आहे.
