अहमदनगर (दि.१४ ऑगस्ट):-श्रीगोंदा येथून गजानन कॉलनी मधून महाराष्ट्र राज्यात विक्रीस व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेला 6 लाख 16 हजार 204/-रुपये किंमतीचा पानमसाला व गुटखा जप्त करण्यास तसेच 1 आरोपी ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक नेमुन अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.स्थागुशा चे पथक अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत इसम नामे रवी दळवी हा वडळी रोड,गजानन कॉलनी,ता.श्रीगोंदा हा करमाळा,जिल्हा सोलापुर येथील पांडु ऊर्फ शकील तांबोळी व शोएब शकील तांबोळी यांच्या कडुन महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत व शरीरास अपायकारक होईल असा विविध कंपनीचा पानमसाला व गुटख्याची खरेदी करुन वडळी रोड, गजानन कॉलनी,ता.श्रीगोंदा येथे पत्र्याचे गोडाऊनमध्ये साठा करुन विक्रीच्या उद्देशाने सुमो गाडीतुन अवैध वाहतुक करतो आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी वडळी रोड,गजानन कॉलनी, ता.श्रीगोंदा येथे जावुन खात्री केली असता पत्र्याचे शेडमध्ये 1 इसम बसलेला दिसला,त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव रवी बबन दळवी (रा. रोकडोबा चौक,ता. श्रीगोंदा) असे सांगितले.
त्याचे गोडाऊन मधील मालाबाबत विचारपुस करता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने पंचा समक्ष त्याचे गोडाऊनची झडती घेतली असता सदर गोडाऊनमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस व वाहतुकीस प्रतिबंधीत तसेच शरीरास अपायकारक असलेला विविध प्रकारचा पानमसाला व गुटखा मिळुन आल्याने त्यास सदर पानमसाला व गुटखा कोणाचा आहे व तो कोठुन आणला या बाबत विचारपुस करता आरोपी रवी दळवी याने सदरचा माल त्याचा स्वत:चा आहे व पांडु ऊर्फ शकील तांबोळी (फरार) व शोएब शकील तांबोळी (फरार) दोन्ही (रा.करमाळा,जिल्हा सोलापुर) यांचे कडुन विक्रीस आणल्याचे सांगितल्याने.आरोपीस 1,30,680/- रुपये किंमतीचा विमल पानमसाला, 16,200/- रुपये किंमतीचा आरएमडी तंबाखु, 36,000/- रुपये किंमतीची आरएमडी सुपारी, 18,909/- रुपये किंमतीची विमल व्ही वन तंबाखु, 6,000/- रुपये किंमतीचा हिरा पानमसाला व 4,00,000/- रुपये किंमतीची टाटा सुमो गाडी असा एकुण 6,16,204/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन श्रीगोंदा पो.स्टे.गु.र.नं. 759/2024 भान्यासक 123,223, 274, 275, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक व श्री.विवेकानंद वखारे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पोउपनि/समाधान भाटेवाल,पोहेकॉ/ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ/आकाश काळे,जालिंदर माने,मयुर गायकवाड व बाळासाहेब गुंजाळ यांनी केलेली आहे.
