अहमदनगर (दि.१४ ऑगस्ट):-१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा देशात विविध वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो.
अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अनेक गरजवंत गोरगरीब लोकांना या दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्त्यांकडून कोणत्या ना कोणत्या स्वरूपातून मदत सुद्धा केली जाते.म्हणून १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिना निमित्त संपूर्ण दिवसभर शहरातील पाईपलाईनरोड येथील नामांकित हॉटेल महालक्ष्मी वडापाव सेंटर येथे खास खवय्यांसाठी खास ऑफर ठेवली आहे.यात १ (एक) रुपयांमध्ये वडापाव देण्यात येणार असल्याची माहिती हॉटेल महालक्ष्मी वडापाव सेंटरचे संचालक प्रविण सावळे,शंभुराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश वाणी,यांनी दिली.
सदरील उपक्रम हॉटेल महालक्ष्मी,पाईपलाईन रोड,कै.शंकर भाऊ वाणी चौक,सावेडी अ,नगर येथे करण्यात येणार आहे.तरी अहमदनगर नगरवासीयांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे यावेळी आवाहन करण्यात आले.
*अटी लागू*
