Maharashtra247

नगर एलसीबीची थेट उत्तरप्रदेश मध्ये जाऊन कारवाई शेअर मार्केटच्या नावाखाली नागरीकांना गंडा घालणारे दोघे जेरबंद

 

अहमदनगर (दि.१६ ऑगस्ट):-शेअर मार्केटच्या नावाखाली नागरीकांना गंडा घालणारे दोघे आरोपी उत्तरप्रदेश राज्यातून मथुरा तालुक्यातील वृंदावन येथून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

बातमीची हकीगत अशी की,दि.1 ऑगस्ट 2024 रोजी यातील फिर्यादी श्री.राजेंद्र रामराव आढाव (रा.भायगांव,ता.शेवगांव) यांना तसेच गावातील इतरांना आरोपी नामे हरिभाऊ गणपत अकोलकर व मंदाकिनी हरिभाऊ अकोलकर (दोन्ही रा.भायगांव,ता.शेवगांव) यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुक करुन,अधिक नफा मिळवुन देण्याचे खोटे आमिष दाखवुन लोकांकडुन मोठी रक्कम स्विकारुन फिर्यादी व त्यांचा भाऊ रविंद्र व गांवातील इतरांची 65,00,000/- रुपयांची फसवणुक केले बाबत शेवगांव पो.स्टे. येथे गु.र.नं. 662/2024 भारतीय न्याय संहिता कलम 420,406,409,34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शेवगांव तालुका व परिसरातील लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक झाल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पथक नेमुण नमुद गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. स्थागुशा पथकाने आरोपींचे राहते घरी, तसेच शेवगांव परिसरातील आरोपींचे नातेवाईक व मित्रांकडे आरोपीची माहिती घेत असतांना,पथकास गुप्त बातमीदारा मार्फत आरोपी नामे हरिभाऊ अकोलकर हा त्याचे एका मित्रा सोबत वृंदावन,ता.मथुरा,राज्य उत्तरप्रदेश येथे असले बाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी वृंदावन,ता.मथुरा,राज्य उत्तर प्रदेश येथे जावुन तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करुन,आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती घेता बातमीतील वर्णना प्रमाणे 2 इसम मिळुन आले.त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे हरिभाऊ गणपत अकोलकर व महेश दत्तात्रय हरवणे दोन्ही रा. भायगांव,ता.शेवगांव असे असल्याचे सांगितले.आरोपीकडे तसेच आरोपी हरिभाऊ अकोलकर याचे सोबत मिळुन आलेला त्याचा मित्र महेश हरवणे यांचे कडे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुक करुन, अधिक नफा मिळवुन देण्याचे आमिष दाखवुन फसवणुकी बाबत विचारपुस केली असता आरोपी नामे हरिभाऊ अकोलकर याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल असले बाबत व आरोपी नामे महेश हरवणे याने शेवगांव पो.स्टे.गु.र.नं. 597/2024 भादविक 420, 406, 409, 34 प्रमाणे गुन्हा दाखल असले बाबत माहिती दिल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन शेवगांव पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी,शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव, पोकॉ/अमृत आढाव, विशाल तनपुरे,फुरकान शेख व प्रशांत राठोड अंमलदार यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page