Maharashtra247

निरागसता हीच प्रतिभेची ऊर्जा शिल्पकार भगवान रामपुरे 

 

अहमदनगर (दि.१७ ऑगस्ट):आपल्या माध्यमातून ईश्वर कलात्मक नवनिर्मिती करीत असल्याच्या जाणीव असेल तरच कलाकार अद्भुत असामान्य अविष्कार करू शकतो.बालसुलभ निरागसता हीच प्रतिभेची खरी ऊर्जा असते,असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार भगवान रामपुरे यांनी केले.

जीवनात कुठली तरी कला आणि छंद असेल तरच जीवन समृद्ध आणि आनंदी होते,असेही ते म्हणाले.

स्नेहालय आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगर यांनी आयोजित केलेल्या 32 व्या राज्यस्तरीय युवानिर्माण शिबिराचा समारोप आज श्री.रामपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी श्री.रामपूरे यांनी आपल्या अद्भुत शिल्पकलेचे थक्क करणारे प्रदर्शन सर्व युवा शिबीरार्थींना घडवले.श्री.रामपूरे यांची शिल्प निर्मिती चालू असताना सौ.राधिका रामपुरे यांनी ‘कला आणि माणूस’ यासंबंधीच्या उत्कृष्ट कवितांचे सादरीकरण केले. श्री.विवेक नारळकर यांनी श्री. रामपूरे यांची मुलाखत घेतली.

सर्वश्री प्रमोद कांबळे,विकास कांबळे,प्रणिता बोरा,बालाजी वल्लाळ आदी अहमदनगर मधील शिल्पकार आणि चित्रकार यावेळी उपस्थित होते.मानसग्राम  येथे आयोजित 6 दिवसांच्या युवा प्रेरणा शिबिरात 31 डिसेंबर 2027 पर्यंत महाराष्ट्र राज्य बालविवाह मुक्त करण्याचा आणि प्रत्येक अनाथ बालकाला परिवार मिळवून देण्याचा संकल्प शिबिरार्थींनी केला. स्नेहालयाचा उडान प्रकल्प आणि फॅमिली बेस केअर अभियान यांनी यासंबंधीचे सविस्तर मार्गदर्शन शिबिरार्थीना केले.

संवाद-पदयात्रा-मॅरेथॉन

शिबिरार्थीनी संवाद,पदयात्रा,मॅरेथॉन,वृक्षारोपण आणि श्रमदान केले.प्रख्यात लेखिका अमृता देशमुख यांनी ज्ञान प्रेरणा आणि कृती यांचा जीवनातील अनुबंध,पद्मश्री पोपटराव पवार यांनी भारताचे वर्तमान-भविष्य आणि तरुणाई,हनीफ शेख यांनी झोपडपट्ट्या-रासायनिक शेती तरुणाईची मोबाईल ते नशिल्या पदार्थांची बहुविध व्यसनाधीनता, अनिल गावडे यांनी सामाजिक संस्था आणि चळवळीची उभारणी, बाळासाहेब वारुळे यांनी बालमाता आणि अनाथ बालकांचे प्रश्न आणि कायदे,इंग्लंड येथील श्रीमती जॉयस कोनोली यांनी अनाथ-निराधार- कुटुंब वंचित बालकांचे अधिकार आणि आपले कर्तव्य याबद्दल मार्गदर्शन केले.माकांत दोड्डी यांनी मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली,रो. पुरुषोत्तम जाधव आर्थिक आणि आरोग्याचे व्यवस्थापन,मुलांसाठी कार्यरत स्नेहप्रेम संस्थेच्या स्वाती ढवळे-ऊस तोडणी कामगारांसाठी काम करणाऱ्या उचल फाउंडेशनचे सचिन खेडकर-फासेपारधी समूहासाठी कार्यरत बाबा आमटे विद्यार्थी सहाय्यक समितीचे संस्थापक अनंत झेंडे यांनी कामातील आव्हाने-संघटनाचे तंत्र मंत्र यावर संवाद केला.सामाजिक कार्य करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांचा आर्थिक पाया भक्कम असल्याचे नमूद करून युरोप आणि अमेरिकेत नामांकित हॉटेल्सचे प्रमुख शेफ असलेले सागर माळवदे यांनी जगाच्या बदलत्या खाद्य संस्कृतीची माहिती दिली. निलेश वैकर यांनी पर्यटन व्यवसायाची तंत्र आणि मंत्र सांगितली.

रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष नितीन थाडे,सचिव गर्जे सर, माजी अध्यक्ष माधवराव देशमुख यांचे विशेष योगदान शिबिरासाठी लाभले. 

 

 

You cannot copy content of this page