Maharashtra247

भर पावसात एसटी चालकाचे उपोषण सुरू; बदली रद्द करा अन्यथा तीव्र उपोषण करणार-आत्राम

 

यवतमाळ प्रतिनिधी:-यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा डेपोचे एसटी चालक लक्ष्मण हुसेन आत्राम यांची यवतमाळ रा.प. विभाग नियंत्रकानी कोणतेही कारण नसताना हेतू पुरस्कार बदली केली आहे.

त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय केला आहे असे आत्राम यांचे म्हणणे आहे.या अन्यायविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आत्राम यांनी गेल्या तीन दिवसापासून भर पावसात उपोषण सुरू केले आहे.गेल्या २२ वर्षापासून एसटी महामंडळात नोकरीस असून आज तागायत माझ्याकडून एकाही व्यक्तीला दुखापत किंवा अपघात झालेला नाही.

या सर्व गोष्टींचा विचार करून माझी जी हेतू पुरस्कर बदली केलेली आहे ती पुन्हा रद्द करावी अन्यथा आमरण उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आत्राम यांनी दिला आहे.या बाबत अधिक माहिती पीडित उपोषण करते आत्राम यांनी दिली.

You cannot copy content of this page