यवतमाळ प्रतिनिधी:-लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात राबवून महिलांना दरमहा १५०० रू.देऊन राज्य सरकारने जी योजना प्रत्यक्षात आणली व महिलांच्या खात्यात पैसे जमा ही झाले त्याबद्दल सरकारचे स्वागतच आहे परंतु महिलांना स्वातंत्र आहे परंतु सुरक्षा कुठे आहे.
परंतु ‘सुरक्षित माझी बहीण योजना’ राबवून महाराष्ट्रातील सर्व महिलांना सुरक्षा द्या महाराष्ट्रात अजूनही असे काही जिल्हे आहेत किंवा तालुके आहेत त्यात महिलांना खरोखरच सुरक्षेची गरज आहे.मुख्यमंत्री साहेबांच्या अधिपत्याखाली प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी ‘सुरक्षित माझी बहीण योजना’ ही समिती नेमून त्या समितीमध्ये महिला व पुरुष मिळून काम करतील.की ज्याने महिलांवर अन्याय अत्याचार होण्यास मोठ्या प्रमाणावर आळा बसेल.
आजही महिलांवर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणावर होत आहे गेल्या वर्षात अनेक गैंगरेपचे प्रमाणही वाढले आहे.या आरोपींना राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे आरोपी हा मोकाट फिरतो त्यामुळे या समितीमध्ये राजकीय हस्तक्षेप ही नसावा.यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील सामाजिक कार्यकर्त्या राष्ट्रीय अपराध जांच आयोग भारत सरकार महाराष्ट्र प्रेसिडेंट क्राईम ब्रांचच्या सौ.काजल उर्फ निशा गवई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल द्वारे प्रत्येक जिल्ह्यात महिला सुरक्षेसाठी एक समिती जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर नेमवावी अशी मागणी केली आहे.
