गर्दी असल्यामुळे बसमध्ये घेतले नाही बसचालकाचा फाडला गणवेश..अन..लाथा बुक्क्यांनी केली मारहाण तिघांवर तोफखान्यात गुन्हा दाखल
अहमदनगर (दि.१९ ऑगस्ट):-एसटी बसच्या चालक व वाहकास अनोळखी व्यक्तींनी शिवीगाळ करून व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे.एसटी बसच्या चालकाचा सरकारी गणवेश फाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे.सदरील घटना हि शनिवारी दि.१७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी नगर शहरातील तारकपूर बस स्थानकावर घडली आहे.
या प्रकरणी एसटी बसच्या वाहक शैला अमृत क्षिरसागर रा.पारनेर जि.अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात तिघां विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेतील फिर्यादी वाहक शैला क्षिरसागर व चालक सजय परशराम पवार (रा.पारनेर) हे त्यांच्या ताब्यातील बस (एमएच १४ बीटी ३५१६) घेऊन शनिवारी दुपारी साडेबारा वाजता नाशिक येथून नगरमार्गे पारनेरकडे निघाले होते.
बस लोणी येथील पीएमटी बसस्टॉप वर आली असता एका प्रवासाने बसला हात केला परंतु बसमध्ये जागा नसल्याने त्यांनी त्याला बसमध्ये घेतले नाही.बस लोणी बस स्थानकावर आल्यानंतर तो प्रवासी खाजगी वाहनाने तेथे आला त्यांनी वाहक क्षीरसागर व चालक पवार यांच्यासोबत बसमध्ये घेतले नाही म्हणून रागात हूज्जत घालून त्यांना शिवीगाळ केली.हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांनी त्या व्यक्तीला मारहाण करण्यात सुरुवात केली असता तेथून तो पळून गेला.
चालक व वाहक यांनी सायंकाळी 5:30 च्या सुमारास नगर शहरातील तारकपूर बस स्थानकाजवळ बस घेऊन आले.दरम्यान तेथे दोन अनोळखी व्यक्ती बसमध्ये घुसले व त्यांनी चालक व वाहक यांना शिवीगाळ केली व तुमच्यामुळे आमच्या माणसाला लोणी मध्ये लोकांनी मारहाण केली आहे असे म्हणून लाथा बुक्क्याने मारहाण केली तसेच एसटी बस चालक पवार यांचा सरकारी गणवेश फाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला तुम्ही तारकपूर बसस्टॅन्ड वरून पुढे कोठला या ठिकाणावर या तुमच्याकडे पाहतो असे म्हणून त्यांना दम देऊन निघून गेले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.