Maharashtra247

स्प्लेंडरला लावत होता डुब्लिकेट चावी कोतवाली पोलिसांच्या पथकाने पकडले रंगेहाथ;मोटारसायकलची चोरी करुन स्पेअरपार्टची विल्हेवाट लावत होते हे चौघे  

 

अहमदनगर (दि.१९ ऑगस्ट):-मोटारसायकलची चोरी करुन स्पेअरपार्टची विल्हेवाट लावणा-या चोरट्यांना कोतवाली पोलीसांनी ७ मोटारसायकल व गाड्याचे स्पेअरपार्टसह गजाआड केले आहे. दि.२१/०७/२०२४ रोजी फिर्यादी नामे गोपीनाथ तुकाराम घुसाळे (रा. राममंदीरा जवळ गवळीवाडा भिंगार अहमदनगर) यांची स्पलेंडर मोटारसायकल नं MH १६ BB ४३०४ ही केडगाव इंडस्ट्रीयल एरीया मधुन बिल्डींग कामाच्या साईट वरुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे संमती शिवाय लबाडीच्या इरादयाने चोरुन नेली आहे.या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुरनं।८१८/२०२४ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असतांना कोतवाली पोलिस निरिक्षक श्री.प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,सदर गुन्हयातील मोटार सायकल चोरी करणारे आरोपी हे सर्राईत मोटार सायकल चोर असुन ते शहरातील विवीध भागातुन मोटार सायकल चोरी करत असतात व एका दुचाकी गाडी गॅरेजवाल्याच्या मदतीने त्याचे स्पेअर पार्टची खोलुन विक्री केली जाते अशी माहीती मिळाल्याने त्या आरोपींचा शोध घेतला असता एक संशयीत इसम एका स्पलेंडर गाडीला त्याचे कडील डुप्लीकेट चावी लावन्याचा प्रयत्न करत असताना त्यास ताब्यात घेवुन चौकशी केली असता मी सदरची गाडी चोरुन घेवुन जाणार होतो व माझ्या सोबत आणखी दोघे आहेत ते देखील माळीवाडा येथे गाड्या शोधत आहेत आम्ही सदर चोरी केलेल्या गाड्या या भिंगारमध्ये एका दुचाकी फिटर कडुन विक्री करुन त्याचे स्पेअर पार्टची विक्री करतो अशी माहीती दिल्याने त्या तिघांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेतले व त्यांचे नाव विचारले असता रोहीत आप्पासाहेब शिरोले रा.सौरभनगर पंडीत हाँस्पीटल भिंगार,यश प्रकाश ओहळ रा.यशवंत नगर डेअरी फार्म भिंगार,करण कैलास पवार विजय लाईन तुळजा भवानी मंदीरा जवळ आलमगीर रोड भिंगार,इम्रान सलिम शेख रा शाह कॉर्नर आलमगीर भिंगार अ नगर,असे असल्याचे सांगीतले त्यांची घर व गॅरेडची झडती घेतली असता त्यांचेकडे चोरी केलेल्या ५ मोटार सायकल व २ खोललेल्या गाडीचे स्पेअर पार्ट असे एकुण २ लाख ५०,०००/- रु.किंचा मुद्देमाल मिळुन आला आहे.

दरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे,गुन्हे शोध पथकाचे/पोसई महेश शिंदे,पोसई/प्रविण पाटील,पोहेकाँ/योगेश भिंगारदिवे,पोहेकाँ/ विशाल दळवी,पोहेकाँ/ गणेश धोत्रे,पोहेकाँ/ विक्रम वाघमारे,पोहेकाँ/ सुर्यकांत डाके,पोहेकाँ/ सलीम शेख,पोहेकाँ/ राहुल शिंदे,सतीश भांड, पोकाँ/अभय कदम, पोकाँ/अमोल गाढे, पोकाँ/सतिश शिंदे,पोकाँ/अनुप झाडबुके, मोबाईल सेलचे पोकाँ/राहुल गुंडु यांच्या पथकाने केली आहे.

You cannot copy content of this page