डॉक्टर युवतीवर अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कडून भव्य कॅन्डल मार्च
मुंबई प्रतिनिधी:-पश्चिम बंगालमधील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कडून नवी मुंबईत कॅन्डल मोर्चाचे आयोजन केले होते.
या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला सामील झाल्या होत्या.पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टर मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.सर्वसामान्य घरातील एका निष्पाप मुलीवर अत्याचार झाले मात्र पोलीस तपास करत नव्हते,म्हणून तिथल्या नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागलं.
शेवटी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून सीबीआय चौकशी लावली मध्यरात्री पश्चिम बंगाल मधली जनता रस्त्यावर उतरली.जनतेच्या रेट्यापुढे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सुद्धा तिथं नमावं लागलं.या घटनेच्या निषेधार्थ आणि त्या युवतीवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन व्हावे यासाठी कॅन्डल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.मोर्चा संपल्यानंतर या निर्भयाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी भारतीय जनता पार्टी अहमदनगर दक्षिण जिल्हा महिला चिटणीस तथा डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद अध्यक्षा सौ.अनुजा गायकवाड/साळवी म्हणाल्या की अन्याय अत्याचार करणाऱ्या आरोपीला जेलमध्ये न घालता फाशीच्या शिक्षेची तरतूद व्हावी ज्याने कोणाची असे करण्याची हिम्मत होणार नाही.