शाळेत नसतील क्रीडा शिक्षक तर देशाला कसे मिळणार ऑलिंपिक पदक
अहमदनगर प्रतिनिधी:-शाळेत नसतील क्रीडा शिक्षक तर कसे मिळणार ऑलिंपिक पदक असा प्रश्न पालकांना व सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.प्रत्येक शाळेत क्रीडा शिक्षक पाहिजेच अशी मागणी आता जोर धरू राहिली आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या पॅरिस ओलंपिक मध्ये 140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशामध्ये केवळ सहा पदके मिळाली या पदकांचे कौतुक तर आपल्या सर्वांना आहेच आणि क्रीडा प्रेमींना देखील आहे व हायसे वाटणारे आहे.
ही पदके वाढवायचे असतील तर शून्यातून सुरुवात करावी लागेल त्यासाठी शाळा तिथे क्रीडा शिक्षक इयत्ता पहिलीपासून पाहिजे.चीन सारखा देश मोठ्या प्रमाणावर ऑलम्पिक पदके जिंकतो कारण तिथे हजारो एकरात क्रीडा विद्यापीठे आहेत तसेच वयाच्या पाचव्या वर्षापासून क्रीडा प्रशिक्षण दिले जाते तिथे सध्या ऑलम्पिक खेळाडूंना मुक्कामी राहून प्रशिक्षण दिले जाते त्याबद्दल पालकांच्या मुलांना मासिक पगार दिला जातो कारण त्यांची मुले देशासाठी म्हणजेच राष्ट्रासाठी खेळणार आहेत व राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत या उलट आपल्या देशात गेली दहा ते बारा वर्ष शिक्षक भरतीच नाही विशेष म्हणजे यामध्ये कला क्रीडा या दोघांचे नाव देखील नाही मग खेळाडू काय घडतील म्हणून त्यासाठी प्रत्येक शाळेवर क्रीडा शिक्षक हवाच आशी मागणी खेडोपाडी पालकांची मागणी जोर धरत आहे.