Maharashtra247

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या  आमदारावर गुन्हा दाखल

 

अहमदनगर प्रतिनिधी:-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी कोपरगाव येथील सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबतची फिर्याद किर्तनकार भगवान कैलास मोहन ऊर्फ मधुसूदन महाराज यांनी दिली आहे.

फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी रामगिरी महाराज यांनी प्रवचनात केलेल्या विधानावरून आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी दि.१७ ऑगस्ट रोजी प्रसार माध्यमांशी बोलताना समाजाच्या भावना आणि श्रध्दा दुखावल्या जातील,असे विधान केले आहे.तसेच दोन समाजात शत्रुत्व वाढेल,असे वक्तव्य केले. त्यामुळे एका समाजाची भावना व श्रध्दा जाणीवपूर्वक दुखावली आहे.असे म्हटले आहे.

या बाबत भारतीय न्याय संहिता कलम १९२, १९६,३०२ अन्वये आमदार मिटकरीं विरोधात गुन्हा दाखल करून तो अकोला पोलिसांकडे वर्ग केला आहे.

You cannot copy content of this page