साकुर…शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत साकुर रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरा..
संगमनेर (प्रतिनिधी):-संगमनेर तालुक्यातील साकुर येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा येथे इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित रित्या राखीची मानवी प्रतिकृती निर्माण करून सर्वांना रक्षाबंधनाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.तसेच आपल्या शाळेचा अभिमान वाटावा म्हणून शाळेच्या नावाची प्रतिकृती तयार केली.
याप्रसंगी प्रियांका जठार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक राखी निर्मितीची कार्यशाळा घेण्यात आली.वृक्षांचे महत्त्व व वृक्ष आपले बंधू आहेत हा संदेश देण्यासाठी सर्वांनी शालेय परिसरातील वृक्षांना राखी बांधली.तसेच सर्व विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिवराज कदम,सुनील खेडकर,राकेश गायकवाड,लता तांबे,रेवती तिखे,अर्चना कदम,सुरेखा हासे,पोपट गोसावी,अशोक महारनोर,युवराज काळे,उमाजी वाळूंज,निवृत्ती लेंडे,कुणाल नवाळी,स्वप्नील हासे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते,या कार्यक्रमाच्या समारोपाला वृक्षसंवर्धनाची शपथ घेऊन मिठाई वाटप करण्यात आली.