अवैध दारू विक्री विरोधात महिला आक्रमक दारू साठा केला नष्ट;सामाजिक कार्यकर्त्या निशा गवई यांनी हद्दीतील अवैध दारू विक्री बंद करण्याची केली मागणी
वणी प्रतिनिधी:-अवैध् दारू विक्री विरोधात मंदर येथील महिला आक्रमक झाल्या असून ‘बाबू भैया का धाब्या’ मध्ये घुसून महिलांनी अवैधरीत्या दारू विकणाऱ्या धाबा चालकास व त्याच्या सहकार्यास चोप देत मोठ्या प्रमाणात दारू नष्ट केली.
हि घटना आज सकाळी १०.वा.च्या सुमारास वणी रोडवर निलगिरी बनजवळ घड़ली.वारंवार महिलांनी तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी धाब्यावर हल्लाबोल केल्याची माहिती मिळत आहे.याघटनेने एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना समोर आल्याने वणी तालुक्यात राजरोसपणे सुरु असलेल्या अवैध दारुविक्रीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.या महिलांना धाब्यावर सोडण्यासाठी गेलेल्या ऑटो चालकास ढाबा मालकाने दमदाटी केली व तुला पाहून घेतो म्हणाला तशी फिर्याद ऑटो चालकाने वणी पोलीस स्टेशनला दिलेली आहे.दिलेल्या फिर्यादीवरून ढाबा चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध दारू विक्री विरोधात सामाजिक कार्यकर्त्या काजल उर्फ निशा गवई यांनी तीव्र संताप वक्त केला असून त्यांच्या खांद्याला दुखापत झाली असून तरीही त्या या मोहिमेत सहभागी झाल्या असून त्यांनी वणी पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व अवैध दारू विक्री केंद्र लवकरात लवकर बंद करण्यात यावे अशी मागणी केली आहे.आता पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते हे यावर अवलंबून आहे.