यवतमाळ प्रतिनिधी:-यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा डेपोचे एसटी चालक लक्ष्मण हुसेन आत्राम यांची यवतमाळ रा.प.विभाग नियंत्रकानी कोणतेही कारण नसताना हेतू पुरस्कार बदली केली होती.त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय झाला आहे असे आत्राम यांचे म्हणणे होते.
या अन्यायविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आत्राम यांनी गेल्या तीन दिवसापासून भर पावसात उपोषण सुरू केले होते.गेल्या २२ वर्षापासून एसटी महामंडळात नोकरीस असून आज तागायत माझ्याकडून एकाही व्यक्तीला दुखापत किंवा अपघात झालेला नाही.या सर्व गोष्टींचा विचार करून माझी जी हेतू पुरस्कर बदली केलेली आहे ती पुन्हा रद्द करावी या साठी आत्राम यांनी उपोषण केले होते.
अखेर या उपोषणाला यश मिळाले असून त्यांची बदली रद्द झाली.तसे लेखी आदेश विभाग नियंत्रण राज्य परिवहन यवतमाळ यांनी दिले आहे.या प्रकरणात आत्राम यांच्या बाजूने सामाजिक कार्यकर्त्या काजल उर्फ निशा गवई यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून मेल करून पाठपुरावा केला होता त्याला यश प्राप्त झाले व त्यांची बदली रद्द करण्यात आली.
