Maharashtra247

पद्मशाली समाजाच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी   

 

नगर प्रतिनिधी:-नारळी पौर्णिमा निमित्त पद्मशाली पंच कमिटी ज्ञाती समाज व श्री.मार्कंडेय मंदिर देवस्थान कमिटीच्या वतीने श्री. मार्कंडेय रथोत्सव काढण्यात आले.या रथोत्सवला खा.निलेश लंके,आ.संग्राम जगताप, माजी महापौर भगवान फुलसौंदर,भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष अभय आगरकर,शिवसेना शहर प्रमूख संभाजी कदम,मा.नगरसेवक दिलीप सातपुते,वसंत लोढा आदींनी भेट दिली.

या वेळी पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा व देवस्थानचे अध्यक्ष गणेश विद्ये यांनी आलेल्या पाहुण्याचे स्वागत केले.या वेळी पंच कमिटी व देवस्थानचे वतीने श्रावणी सोमवार असल्याने खिचडी व केळी व बिसलेरीचे वाटप करण्यात आले.तसेच सर्व समाज बांधवांच्या प्रेरणेने भगवान श्री. महादेव तसेच श्री.मार्कंडेय महामुनींची भव्य-दिव्य रथोत्सव,पालखी सोहळा नगर शहरात दिमाखात काढण्यात आली होती.या वेळी एकदंत ग्रुप व शिवराज्यकर्ते ग्रूप,दातरंगे मळाच्या वतिने महाकाल अघोरी नृत्य मोठ्या दिमाखात सादर करण्यात आले होते.

सदर नृत्य हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते तसेच या मिरवणकीत श्री.मार्कंडेय विद्यालयातील विद्यार्थ्यांचे लेझीम पथक तसेच दांडिया पथक रथोत्सवामध्ये प्रमुख आकर्षण होते.संपूर्ण पालखी सोहळा मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट,सुंदर असे लेझीम खेळ आणि दांडिया नृत्य सादर केले.यावेळी समाजातील सर्व घटकातील समाज बांधवांनी कौतुक केले.यावेळी पंच कमिटी व देवस्थानंचे पदाधिकारी व विश्वस्त त्रीलेश येनगंदुल, अमित बूरा,प्रणित अनमल,पुरशोत्तम सब्बन,अभिजित चीप्पा, ऍड.राजू गाली,विनोद बोगा,मंगलाराप पंतलू, ऋषिकेश गुंडला,राजू बोगा,गणेश चेनुर,शंकर जिंदम आदी समाज बांधव व विश्वस्त यावेळी उपस्थित होते.

You cannot copy content of this page