Maharashtra247

शहरातील सर्व गणेश मंडळांच्या बैठकीचे महानगरपालिकेत नियोजन मंडळाच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आयुक्तांचे अवाहन

अहमदनगर (दि.२१ ऑगस्ट)-गणेश उत्सव 2024 च्या अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील सर्वगणेश मंडळाची बैठक शुक्रवार दि.23 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12.00 वाजता महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत येथे आयोजीत करण्यांत आलेली आहे.या करीता शहरातील सर्व गणेश मंड़ळ यांचे पदाधिकारी/प्रतिनिधी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे अवाहन मनपा आयुक्त श्री.यशवंत डांगे यांनी केलेले आहे.

सदर बैठकी दरम्यान गणेश मंडळाच्या मंडपास देण्यांत येणा-या परवानग्याकरीता मनपा तर्फे एक खिड़की योजना राबविण्यांत येणार आहे.सदरच्या परवानग्या मंडळाच्या सोई करीता ऑनलाईन पध्दतीने देण्याचे नियोजन करण्यांत आलेले आहे.या बाबतची माहिती देणे करीता तसेच विचारविनिमय करणे करीता गणेश मंडळाच्या प्रतिनिधी पदाधिकारी व मनपा अधिकारी यांची संयुक्तीक बैठक दि. 23 ऑगस्ट 2024 रोजी मनपा मुख्य प्रशासकीय इमारत येथील मुख्य सभागृह येथे दुपारी 12.00 वाजता आयोजीत करण्यांत आलेली आहे.

सदर बैठकीस शहरातील सर्व गणेश मंडळाचे प्रतिनिधी/पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे अवाहन मनपा आयुक्त श्री. यशवंत डांगे यांनी केलेले आहे.

You cannot copy content of this page