पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन;अनुसूचित जाती जमाती आरक्षण संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी):-अनुसूचित जाती जमाती आरक्षण संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करण्यात यावा व कोलकत्ता व बदलापुरातील घडलेल्या घटनेचां निषेध व्यक्त करून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड, समवेत जिल्हा संपर्कप्रमुख नितीन कसबेकर,जिल्हा उपाध्यक्ष नितीन साळवे,विशाल गायकवाड,किरण जाधव,शहराध्यक्ष संजय साळवे, महिला जिल्हा अध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे,सुरेशराव भिंगारदिवे, युवा नेते सिद्धांत गायकवाड,अक्षय बोरुडे,प्रज्ञशील पाटेकर,अनिकेत विधाते,सनी गायकवाड,स्वप्निल गायकवाड,सिद्धार्थ जाधव,अरमान गोहेर,करण देठे,प्रताप सर्वान, आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या व क्रिमिलेयर संदर्भात १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेला निर्णय हा असवैधानिक व सामाजिक फूट पाडणारा असा आहे.सामाजिक दृष्ट्या अत्यंत घातक ठरणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्यात येत असून सर्वोच्च न्यायालयाद्वारे घेतल्या गेलेल्या या मागासवर्गीय विरोधी निर्णयामुळे सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत असून प्रचंड असा रोष व्यक्त केला जात आहे.तेव्हा या घातक निर्णयासंदर्भात योग्य तोडगा काढण्यासाठी संसदीय विशेष अधिवेशन बोलावून अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.