प्रतिनिधी (१४ जानेवारी):-चर्मकार विकास संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष संजय खामकर व मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाष मराठे यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन संत रोहिदास महाराज पुरस्कार जाहीर करण्यासाठी विनंती केली.शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतिने संत रोहिदास महाराज पुरस्कार चर्मकार समाजातील भरीव सामाजिक कार्य व संत रोहिदास महाराज यांचा प्रचार,प्रसार करणाऱ्या समाज बांधवांना दर वर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येतो परंतु सन २०१९ पासुन २०२१ /२०२२ या वर्षीचे पुरस्कार देण्यात आले नाहीत.संत रोहिदास महाराज जयंती ५ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपुर्ण भारतासह महाराष्ट्रात साजरी करण्यात येणार आहे. जयंतीच्या शुभदिनी संत रोहिदास महाराज पुरस्कार मिळाला तर समाज बांधवांचा आनंद व्दिगणीत होईल म्हणुन चर्मकार विकास संघाच्या वतिने मुख्यंमत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार ङाँ.श्रीकांत शिंदे यांची भेट घेवुन निवेदन देण्यात आले तसेच खासदार ङाँ श्रीकांत शिंदे यांच्याशी समाजाच्या विविध प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली असता पुढील काळात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या पुढाकाराने शासनाच्या माध्यमातून चर्मकार समाजाचे प्रश्न सोङवुन समाजाला न्याय देण्यात येईल असे अश्वासन दिले.या प्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना प्रवक्ता माजी मंत्री विजय शिवथरे ,प्रवक्ता नरेश म्हस्के,राज्य प्रवक्ता संजय भोर,चर्मकार विकास संघ मुंबई प्रदेशअध्यक्ष सुभाष मराठे,चर्मकार विकास संघ प्रदेशअध्यक्ष संजय
खामकर,चर्मकार विकास संघ मुंबई महिला प्रदेशाध्यक्षा प्रियंका गजरे इत्यादी उपस्थित होते.
Trending Topics:
Trending
- एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
- नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
