देवळी प्रतिनिधी(सागर झोरे):-माहिती व प्रसारण मंत्रालय,महाराष्ट्र,केंद्रीय संचार ब्युरो पुणे,तसेच क्षेत्रीय कार्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानाने “राष्ट्रीय युवा दिवस” या विषयावर जनजागृति प्रबोधनात्मक कार्यक्रमचे आयोजन देवळी तालुक्यातील सोनेगांव (आबाजी) या गावी ज्ञानभारती महाविद्यालय देवळीच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये दि.१२ जानेवारी २०२३ ला राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवचैतन्य बहु विकास युवा मंडळ शिरोली ता.घाटंजी जि.यवतमाळ या संस्था जनजागृती व कलापथकाव्दारे शिबीरातील हजारो विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.या मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ,व्यसन,कौटुंबिक अत्याचार,आरोग्य या बाबत पथनाट्यद्वारे प्रकाश टाकला.कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रकल्प गिता व्दारे वातावरण निर्मिती करुन कार्यक्रमाला सुरवात केली या कार्यक्रमाला ज्ञानभारती महाविद्यालय सर्व शिक्षकवृंद,कर्मचारी, विद्यार्थी,व असंख्य गावकरी उपस्थित होते.या कार्यक्रमाला क्षेत्रिय कार्यालय वर्धाचे श्री हंसराजजी राऊत सर यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवचैतन्य आर्ट ग्रुप घाटंजी चे सांस्कृतिक प्रमुख प्रफुल्ल राऊत,सचिव राहुल जीवने, कलावंत कु.दिपाली आडे,कु.किरण राठोड,नितेश मोहुर्ले,नरेश कुंटलवार, अशोक देवरे,संदेश महल्ले,पियुष लोखंडे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रम नंतर मार्गदर्शन व आभार प्रदर्शन ज्ञानभारती महाविद्यालय प्राचार्य सौ अर्चना बारंगे मॅडम यांनी केले.
