Maharashtra247

अल्पवयीन मुलीस पळुन घेऊन जाणारा आरोपी अवघ्या ४८ तासातच गजाआड मुलीची सुटका

 

अहमदनगर (दि.२५ ऑगस्ट):-अल्पवयीन मुलीस कशाचे तरी आमिष दाखवुन पळुन घेऊन जाणा-या आरोपीस राहुरी पोलिसांनी अवघ्या ४८ तासात पकडून मुलीला पालकांच्या स्वाधीन केले आहे.या अपहरित मुलीस आरोपीने प्रथम नाशिक, नंतर सुरत व तेथून धुळे येथे नेले परंतु पोलिसांनी तपास करत मुलीचे धुळ्यातुन सुटका केली.

बातमीची हकीकत अशी की,अल्पवयीन मुलगी हीस राहते घरातून कोणीतरी अनोळखी इसमाने अज्ञात करणाकरिता कशाचे तरी अमिष दाखवून पळून नेले आहे या बाबत राहुरी पोलीस ठाणे येथे गुरनं. 945/2024 बी एन एस कलम 137 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.दाखल असलेल्या पुण्यात कुठलाही प्रकारचा पुरावा नसताना पोलिसांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की इसम नामे सचिन भाऊसाहेब विटनोर (रा. मानोरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर) यानी सदर अल्पवयीन मुलीस सुरत राज्य-गुजरात येथे अपहरण करून नेले आहे.

अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथक सुरत राज्य गुजरात कडे जात असताना मध्येच पुन्हा गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सदर इसम हा अल्पवयीन मुलीस घेऊन धुळे येथे येत आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने धुळे जिल्ह्याच्या हद्दीतून बसस्थानक येथे येत असताना पहाटे आरोपीस मुलीसह पकडले.त्यास ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलीची सुटका करुन तिच्या पालकांच्या ताब्यात देऊन आरोपीस पुढील कारवाई करीता अटक करण्यात आली आहे.

हि कारवाई श्री. राकेश ओला पोलिस अधीक्षक,श्री.वैभव कुलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक,श्री.बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन,सपोनी/परदेशी, पोहेकॉ/सुरज गायकवाड,पोहेकॉ/राहुल यादव,पोना/प्रविण बागुल,पोकॉ/प्रमोद ढाकणे,पोकॉ/सतीश कुऱ्हाडे,पोकॉ/नदीम शेख,पोकॉ/सचिन ताजणे,पोकॉ/गोवर्धन कदम,पोकॉ/अंकुश भोसले,पोकॉ/संतोष राठोड तसेच मोबाईल सेल श्रीरामपुरचे पोना/सचिन धनाड,पोना/संतोष दरेकर यांनी केली आहे सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी हे करीत आहेत.

You cannot copy content of this page