Maharashtra247

शहरात धारदार शस्त्राने एकावर वार कोतवालीत गुन्हा दाखल

 

अहमदनगर (दि.२६ ऑगस्ट):-जागेच्या वादातून व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना शनिवार दि.२४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वा.सुमारास घडली आहे.

अमोल रतनसिंग ठाकूर (रा.चिपाडे मळा, केडगाव) असे जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल गौतम ठाकूर,कुणाल गौतम ठाकूर,गौतम रमेश ठाकूर (रा.जुना बाजार,नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.यातील फिर्यादी यांची शहरातील नांगरे गल्लीत चहाची टपरी आहे.त्यांचे संशयित आरोपीं सोबत जागेवरून वाद आहेत.या कारणातून आरोपी यांनी फिर्यादीच्या चहाच्या टपरीवर येत नुकसान केले.

फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.धारदार शस्त्राने फिर्यादीच्या डोक्यात वार करून त्यांना जखमी केले.जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादींच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला असून अधिक तपास कोतवालीचे पोलीस अंमलदार सचिन गायकवाड हे करत आहेत.

You cannot copy content of this page