Maharashtra247

एकाच दिवशी शहरात दोन ठिकाणी चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीस तोफखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

 

अहमदनगर (दि.२६ ऑगस्ट):-एकाच दिवशी दोन ठिकाणी चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीस तोफखाना पोलीसांनी जेरबंद करत त्याच्या कडून चोरलेले सोने जप्त केले आहे.

तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुरनं ८४४/२०२३ भारतीय न्याय संहिता कलम ३०४ प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी नामे सौ.सुजाता राहुल अष्टेकर (रा.पाईपलाईन रोड) या त्यांचे घराकडून पाईपलाईन रोडकडे पायी जात असताना त्यांच्या गळ्यातील पावणेदोन तोळे सोन्याचे ४५,०००/- रु.चे गंठण हे बळजबरीने हिसकावुन घेवुन चोरेटे पळून गेले बाबत तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसेच दुसरा गुन्हा तोफखाना पोलीस स्टेशन गुरनं ८४४/२०२३ भारतीय न्याय संहिता कलम ३०४ प्रमाणे फिर्यादी नामे सौ.अंजली अनिल धोपडकर (रा.भुतकरवाडी अहमदनगर) दुपारी ४.०० वा.सुमारस महादेवाचे दर्शन घेऊन घरी जात असताना त्यांचे गळयातील दिड तोळे वजनाची ४५,००० रू. किमतीची सौन्याची चैन बळजबरीने हिसकावुन घेवुन चोरटे पळून गेले होते.

याबाबतच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास अत्यंत गोपनीय माहितीद्वारे पोलिसांनी करुन आरोपी नामे परवेझ जावेद मणियार (रा.नाशिक) याने केल्याचे निष्पन्न झाले.त्यास अटक करुन त्याच्याकडे दागिन्यांची विचारपूस केली असता त्याने चोरलेले सोन्याचे दागीने हे नाशिक येथील एका सोनारास विकले असल्याचे सांगीतले. त्यावरुन तपासात सोनाराने यातील आरोपी याने चोरलेले १,९५,०००/-रु. किंमतीचे सोने गुन्हयाचे तपासात हस्तगत करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे.

सदरची कारवाई ही श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, तोफखाना पो.नि.श्री. आंनद कोकरे,पोलीस उपनिरीक्षक शैलेश बी.पाटील,सहाय्यक फौजदार/तनवीर शेख, पोहेकॉ/दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाठ,अहमद इनामदार,सुधीर खाड़े, भानुदास खेडकर,दिनेश मोरे,सुरज वबाळे,संदिप धामणे,वसीम पठाण, सुमीत गवळी,सतीष त्रिभुवन,शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर,सतीष भवर,बाळासाहेब भापसे राहुल म्हस्के,चेतन मोहिते यांनी केली आहे.

You cannot copy content of this page