महामार्गावरील अपघाताला आमंत्रण देणारे स्ट्रीट लाईट पोल तातडीने काढा अन्यथा खळ खट्याक करू-मनसे नेते अविनाश पवार
सुपा प्रतिनिधी:-नगर-पुणे महामार्गावर औद्योगिक विकास प्राधिकरण महामंडळाच्या माध्यमातून सुपा एमआयडीसी मधील कामगार वर्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.
नगर-पुणे महामार्गावर औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांना कामावर येण्यासाठी व जाण्यासाठी महामार्गावर रात्रीच्या अंधारात जिवघेण्या प्रवासाचा सामना करावा लागत होता तसेच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कामगारांना लुटण्याच्या ही घटना घडत असल्याने ही बाब औद्योगिक विकास प्राधिकरण महामंडळाच्या लक्षात आल्यानंतर महामंडळाच्या माध्यमातून महामार्गावर स्ट्रीट लाईट पोलच्या माध्यमातून काम चालू केल्यामुळे सुपा औद्योगिक कंपनी कामगार आणि सुपा तसेच वाघुंडे गावातील नागरिकांनी महामार्गावर स्ट्रीट लाईट चालू होणार असल्याने समाधान व्यक्त केले होते.
काही स्थानिक नागरिकांनी सदर कामं निकृष्ट दर्जाचे चालू असल्याचे सांगितले असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सदर कामांची पाहणी केली असता चालू कामं निकृंष्ट दर्जाचं असल्याचे निदर्शनास आले.
सदर काम करणाऱ्या ठेकेदाराने इस्टिमेट प्रमाने कामं करणं गरजेचं असताना तसं न करता अतिशय निकृष्ट कामं केल्या मुळे स्ट्रीट लाईट पोल सुरू व्हायच्या अगोदरच जमिनीवर पडतात की काय अशी भिती नागरिकांनी व्यक्त केली असल्याने तसेच नगर~ पुणे महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने पोल पडुन दुर्दैवी दुर्घटना घडु नये या संदर्भात औद्योगिक विकास महामंडळाच्या लक्षात हा प्रकार उघडकीस आणुन सुद्धा दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
सदरील अधिकारी संबंधित ठेकेदारांवर काय कारवाई करणार याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लक्ष रहाणार असल्याचे मनसे माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी सांगितले.यावेळी सहकार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के तसेच सुपा शहर अध्यक्ष अक्षय सुर्यवंशी उपस्थित होते.