Maharashtra247

ट्रक चालकास लुटणाऱ्या आरोपीच्या अवघ्या १२ तासात भिंगार कॅम्प पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 

अहमदनगर (दि.३१ ऑगस्ट):-ट्रक चालकास लुटणाऱ्या आरोपीस भिंगार कॅम्प पोलीसांनी अवघ्या 12 तासात अटक केली आहे.

बातमीची हकीकत अशी की,दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी रात्रीच्या व सुमारास नगर सोलापुर रोडवर मुठठी चौकाजवळ फिर्यादी किरण मैमुन मलीक वय-३० वर्ष (रा.कुंदन अलीगेट काटगुडी कृष्णा मंदीर बंग्लोर राज्य कर्नाटक) हे त्यांचे ताब्यातील ट्रक क्रमांक-के.ए.५३ ए ए ४६१९ ही रोडचे कड़ेला उभी करुन त्यात झोपलेले असताना दोन अज्ञात इसमानी ट्रकचे कँबीन मध्ये येवुन फिर्यादीचे ताब्यातील ३०,०००/ – रु.रोख रक्कम व ७০০০ हजार रु.कि.चा मोबाईल,ए.टी. एम.कार्ड असा एकुण ३७०००/-रु.कि.चा मुद्येमाल बळजबरीने हिसकावुन घेउन गेले बाबत फिर्यादीने दिलेल्या जबाबावरून कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुरनं.६७०/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे क.३०९ (४),३५२,३५१(२)३५१(३)३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

दरम्यान भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे स.पो.नि.जगदीश मुलगीर यांना गोपनिय बातमीदाराकडन मिळालेल्या माहीतीच्या आधारे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर गुन्हयातील आरोपी हे चांदणी चौक येथे येणार असल्याची माहीती मिळाल्याने तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाउन सापळा रचुन बातमीतील वर्णना प्रमाणे इसम सदर ठीकाणी येताच त्यांना पथकातील अंमलदार यांनी ताब्यात घेत असताना त्यांना पोलीस आल्याची चाहुल लागताच ते पळुन जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यातील एकास ताब्यात घेउन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सागर उर्फ पिल्या गुलाब सकट (रा.तुक्कड ओढा दरेवाडी शिवार ता.जि. अहमदनगर) असे सांगीतले.

त्यास विश्वासात घेजन विचारपुस केली असता त्यांने गुन्हयाची कबुली देउन सदरचा गुन्हा मी व माझा मित्र दिपक राजेंद्र बेरड रा.दरेवाड़ी असे दोघांनी केलेला आहे असे सांगितले.सदर गुन्हयातील अटक आरोपीकडुन फिर्यादीचा चोरलेल्या मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प स.पो.निरी.जगदीश मुलगीर यांच्या सूचनेनुसार पो.स.ई.किरण साळुंके,पो.उपनिरी.पतंगे,सफौ/कैलास सोनार,पोहेकॉ/संदीप घोड़के, दिपक शिंदे,रवि टकले, रामनाथ डोळे,पोकॉ/समीर शेख,प्रमोद लहारे, दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ/नितीन शिंदे,चालक काळे व बेरड यांनी केली आहे.

You cannot copy content of this page