बेवारस मयत व्यक्तीची ओळख पटवावी म्हणून तोफखाना पोलिसांनी केले आवाहन
अहमदनगर (दि.३१ ऑगस्ट):-बेवारस व्यक्ती नामे गोपाल गुरु खुडे (वय ७२ वर्ष पत्ता माहिती नाही राहणार अहमदनगर) सदरील व्यक्तीस दि.२० ऑगस्ट २०२४ रोजी सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून औषधोपचार कामी कर्मचाऱ्यांनी दाखल केले होते.
परंतु सदरील इसम हा दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी उपचार चालू असताना मयत झाला.मयत झालेल्या इसमाचे नातेवाईक किंवा ओळखीचे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.या मयत इसमाची ओळख पटवावी म्हणून तोफखाना पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध व्हावा म्हणून या नंबरशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.
पोहेकॉ.व्ही.सी.गंगावणे मो.9552521584,0241-2416118